शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेड उभारून भूखंड बळकावण्याचा उद्योग

By admin | Updated: July 16, 2015 20:42 IST

ढेबेवाडीतील स्थिती : शासकीय जागा अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

सणबूर : ढेबेवाडी येथील नवीन गावठाणात बेकायदेशीरपणे बांधकाम किंवा शेड उभी करून शासकीय प्लॉट बळकाविण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण शासकीय गावठाण अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. संबंधित विभाग मात्र गांधारीची भूमिका घेत असून, वाढत्या अतिक्रमणावर हातोडा घालणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ढेबेवाडी गावाची लोकसंख्या पाहता शासनाने ढेबेवाडी गावासाठी नवीन गावठाण उपलब्ध करून दिले. त्या गावठाणात मागणीनुसार शासनाने अनेक कुटुंबांना प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनेकांनी त्याठिकाणी प्लॉट मिळविले व घरे उभी केली आहेत. मात्र, अनेकांनी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत त्या-त्या वेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा उद्योग केला आहे. संपूर्ण गावठाणात बेकायदेशीर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अलीकडे वांग-मराठवाडी धरण प्रकल्पामुळे जागेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात ढेबेवाडीचा विस्तार विविध अंगाने वाढत चालला आहे. त्यामुळे ढेबेवाडीच्या आजूबाजूला वसाहती वाढत चालल्या आहेत. नवीन गावठाणात अनेकांनी बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. तर अनेकांनी सरकारी जागेत पत्र्याची शेड उभी केली आहे. मात्र, संबंधित महसूल विभाग व ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. येथील पोलीस स्टेशनच्या बाजूच्या ग्राउंडमध्ये ढेबेवाडीतील अनेक कुटुंबांचे प्लॉट गेले आहेत. ती कुटुंबे आजही वाऱ्यावरच आहेत. मात्र त्यांची कुणाला खंत न परवा. मात्र स्वत:चे खिशे गरम करण्याच्या नादात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेकांनी नवीन गावठाण स्वत:ची जहागिरी समजून गावठाणातील मोक्याच्या जागेवर शेड उभी केली आहेत. तर अनधिकृत बांधकामेही करण्यात आली आहेत. मात्र तरीही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण नवीन गावठाणातील मोजणी करून अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी ढेबेवाडीतील ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)