शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या पाण्यात वाढ; यवतेश्वर घाटात दरड

By admin | Updated: July 3, 2016 00:11 IST

पश्चिमेकडे पावसाचा जोर : साताऱ्यात झाड पडले; वेण्णा लेकमधील पाणीसाठा वाढू लागला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात दरड कोसळली तर गेल्या २४ तासांत कोयना धरणातील पाणी पातळीत २ टीएमसीने वाढ झाली आहे. महाबळेश्वरला वेण्णा लेकमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सातारा शहरात मोळाचा ओढा परिसरात झाड उन्मळून पडल्याने पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणातील पाणीपातळी तब्बल ६ फुटांने वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात २ टीएमसीची वाढ झाली आहे. सध्या धरणातील साठा १४.३६ टीएमसी झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासांत कोयना येथे ३२ मिमी (५९२) पाऊस झाला. तर नवजा ४५ (७७८) आणि महाबळेश्वर ६७ (६७४) मिमी पाऊस
झाला. शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दाणादाण उडाली असून, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची घटना घडली आहे. कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सध्या कास पठारावर फुले उमलली नसली तरी दर शनिवारी-रविवारी सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पुण्या-मुंबईचे शेकडो पर्यटक धाव घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कास पठार परिसरातील ओढे, नाले लाल मातीच्या रंगाने फेसाळू लागले आहेत.
अनेक धबधबेही कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस भात लागणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भात शेतीच्या शिवारात पाणी साचल्यामुळे डोंगरावरील शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पाऊस
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा : सातारा १३.७, जावळी ४२.८, पाटण २१, कऱ्हाड ७.२, कोरेगाव ४.१, खटाव ०.७, माण ०.१, फलटण ०.७, खंडाळा ११.४, महाबळेश्वर १०३.१.
पूर्वेकडे थंड वारे...
पश्चिम भागात पाऊस पडत असला तरी पूर्व भागात मात्र पावसाचे दर्शन नाही. सध्या माण, खटाव तालुक्यांत थडगार वारे वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.