विनयभंग करून पती, मुलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:16+5:302021-07-11T04:26:16+5:30

सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करून तिच्या पती आणि मुलास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...

Husband beats child by molestation | विनयभंग करून पती, मुलास मारहाण

विनयभंग करून पती, मुलास मारहाण

सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करून तिच्या पती आणि मुलास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित कृष्णात चव्हाण, कृष्णात परबती चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तारेचे कंपाऊंड घालण्याच्या कारणावरून अजित याने तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्या पतीस लाकडी काठीने व मुलास लोखंडी पारेने मारहाण केली. याचवेळी कृष्णात याने धक्काबुक्की करत शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिल्यानंतर अजित आणि कृष्णात या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार बागवान हे करत आहेत.

Web Title: Husband beats child by molestation