शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या निवासस्थानी धनगर समाज करणार उपोषण

By admin | Updated: July 22, 2014 22:12 IST

मुख्य संघटक जयप्रकाश हुलवान

सातारा : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दि. ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती महराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे मुख्य संघटक जयप्रकाश हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.धनगर समाजाला आरक्षण देताना ‘र’ चा ‘ड’ झाल्याने हा समाज कित्येक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. धनगर आणि धनगड ही एकच जात असलेला अहवाल ६५ वर्षांपासून शासनाने नाकारलेला आहे.राज्यघटनेत कलम ३४२ खालील महाराष्ट्र अनुसूचित जमातीतील यादीत ओरान धनगर अशी नोंद आहे. हिंदी भाषेत धनगड व मराठी भाषेत धनगर हे दोन्ही शब्द एकाअर्थी आहेत. उदाहरणार्थ मराठीत गुरगाव तर हिंदीत गुडगाव, मराठीत एकर तर हिंदीत एक्कड म्हणतात. त्याचप्रमाणे मराठीत धनगर तर हिंदीत धनगड म्हणतात. त्यामुळे धनगर आणि धनगड ही एकच जात आहे. बिहार, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, आंध्र या राज्यांत धनगर जातीचा अनुसूचित जमातीत समावेश केला आहे. केंद्र शासनाच्या जनजातीय कार्यमंत्रालयाने २००७ ते २००९ अहवालात महाराष्ट्रातील अनुसूचित जनजमातीच्या यादीतही ओरान धनगर अशीच नोंद आहे. शासनाने राजपत्र १९ मार्च २००१ मध्ये संविधान अनुसूचित जमाती आदेश १९५० परिशिष्ठातील भाग ९ मध्ये धनगर समाज हा अनुसूचित जातीय जमातीत आहे, असे नोंद करण्यात आले आहे.जोपर्यंत महाराष्ट्र शासन धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असेही हुलवान यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)