शिवरायांचा इतिहास जगाला प्रेरणादायी : शेटे

By Admin | Updated: December 1, 2014 00:16 IST2014-11-30T21:25:59+5:302014-12-01T00:16:48+5:30

‘वीर जीवा महाले’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.

History of Shivrajaya is inspirational: Sheet | शिवरायांचा इतिहास जगाला प्रेरणादायी : शेटे

शिवरायांचा इतिहास जगाला प्रेरणादायी : शेटे

वाई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती़ शिवाजी महारांजाचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व शिवचरित्र अभ्यासक मोहनराव शेटे यांनी केले.वाई येथील महागणपती घाटावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावरून देण्यात येणाऱ्या ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.
या वर्षीचा ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना देण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे मेव्हणे भगवानदास झा (सूरत) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र व मानाचे चांदीचे कडे देऊन सन्मानित करण्यात आले़. यावेळी ‘पतांजी काका बोकील अभिवक्ता’ पुरस्कार हा अ‍ॅड़ देविदास शिंदे तर शौर्य पुरस्काराने स्वाती बापट (देवगड) यांना गौरविण्यात आले.
प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजया भोसले, पंडितकाका मोडक, सुमन सपकाळ (महाले), महाबळेश्वरचे माजी़ नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने, तालुका प्रमुख नंदकुमार नायकवडी, शहर प्रमुख किरण खामकर, प्रतापगड उत्सव समितीचा जिल्हाध्यक्ष संजय सणस, विवेक भोसले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


मूर्तीचे पूजन
भवानीमाता व शिवरायांच्या प्रतिमांचे पालकीतून वाई शहरातून मिरवणूक व वीर जीवा महाले मूर्तीचे कार्यक्रमस्थळी आगमन छ़ शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन व वीर जीवा महाले यांच्या तेराव्या वंशजाची पत्नी सुमन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अंध शाहीर पीयूषा भोसले सातारा व शाहीर रंगराव पाटील, कोल्हापूर यांचा शिवाजी महारांजाचा इतिहास सांगणारा पोवाड्याने सुरूवात करण्यात झाली.

Web Title: History of Shivrajaya is inspirational: Sheet