शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीला शालेय स्तरावर दुजाभाव!

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

फक्त चार तासिका : समान परीक्षा पद्धत असताना अन्याय का?

गुलाब पठाण -किडगाव -देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला सन्मान दिला गेला; मात्र याच हिंदी विषयाला महाराष्ट्रात शालेय स्तरावर दुय्यम दर्जाची वागणूक शासन देत आहे. हिंदी विषयाला फक्त चार तासिका आहेत. समान परीक्षा पध्दत असताना असा अन्याय का? असा प्रश्न करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये द्वितीय भाषा म्हणून हिंदी विषयाला शालेय स्तरावर पाचवी ते दहावी पर्यंत शिकवले जाते. हिंदी बरोबर मराठी व इंग्रजी विषयही शिकवले जातात. त्रिभाषा सूत्रानुसार भाषा गटासाठी एकूण १८ तासिका आहेत. त्यापैकी मराठी विषयासाठी सहा तासिका देण्यात आल्या असून, तृतीय भाषा इंग्रजीसाठी आठ तासिकांचे नियोजन वेळापत्रकात असते; मात्र हिंदी विषयाला फक्त चार तासिका देऊन गेली अनेक वर्षे शासन दुय्यम दर्जाची वागणूक देत आहे. तिन्ही भाषांना समान गुण आहेत. असे असतानाही हिंदी विषयावर अन्याय का असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या समान परीक्षा पद्धती आहे. मात्र तासिका वाटपात कोठेही समानता दिसून येत नाही. त्याचा परिणाम राज्यभरातील हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित शिक्षकांवर इतर शालेय विषय शिकवण्याचा ताण येत आहे. अन्य विषयाचा अभ्यासक्रम पार पाडावा लागत आहे. त्यामुळे याचा विचार होण्याची खरी गरज असल्याचे दिसून येत आहे. समान गुण, समान भाषा, समान तासिका या तत्त्वानुसार तासिकांची फेरवाटणी करून राष्ट्रभाषा हिंदीला शालेय स्तरावर वेळापत्रकात सहा तासिका देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने अनेकवेळा शासनाकडे केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या विषयावर शासन उदासीनच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांत नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तासिका वाढ संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्षांना पत्र पाठवून शालेय स्तरावर भाषा विषयांना १८ तासिका पैकी भाषानिहाय विभागणी करण्याचे सांगितले आहे. मात्र, स्पष्टपणे सहा तासिका हिंदी विषयाला देण्यात याव्यात याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भाषा विषयात सर्वात कमी तासिका हिंदी विषयाला असून, हे भिजत घोंगडे कधीपर्यंत राहणार हा संशोधनाचा भाग बनल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांतही नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी अद्याप नाही. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यातील महामंडळाचे पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. - ता. का. सूर्यवंशी, उपाध्यक्षमहाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळपाचवीच्या नवीन अभ्यासक्रमात दुजाभाव...बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ अन्वये विद्यार्थ्यांसाठी बालभारती, पुणे यांच्या वतीने पाठ्यक्रम तयार करून छापला जातो. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवीचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. जून महिन्यात सर्व विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्या हातात नवीन पुस्तके मिळाली. मात्र, नेहमीप्रमाणेच पाचवीच्या हिंदी द्वितीय भाषा ‘सुलभभारती’ पुस्तकाची छपाई मात्र दोन रंगात करण्यात आली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आकर्षक आहे. मात्र, आतील सर्वच्या सर्व चित्रे दोन रंगांत छापली गेली.