रानडुकरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST2021-01-13T05:41:21+5:302021-01-13T05:41:21+5:30

-- नियमांचे उल्लंघन कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवर विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे ...

A herd of cows | रानडुकरांचा धुमाकूळ

रानडुकरांचा धुमाकूळ

--

नियमांचे उल्लंघन

कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवर विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. काही ठिकाणी दुकानातील साहित्यही रस्त्यावर तसेच फूटपाथवर मांडण्यात आल्याचे दिसून येते.

--

रस्त्याचे डांबरीकरण (फोटो : १२इन्फोबॉक्स०२)

कोपर्डे हवेली : विभागात ठिकठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत. यंदा परतीचा पाऊस लांबला. अवकाळी पावसानेही वेळोवेळी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्याच्या कामांना उशिरा सुरूवात झाली. सध्या बांधकाम विभागाने विभागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ केला आहे.

--

बिबट्याची दहशत

कऱ्हाड : वसंतगड, ता़ कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे़. पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. मात्र, या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

Web Title: A herd of cows