मारहाण करून कारचे चाक पायावर घातले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:20+5:302021-07-11T04:26:20+5:30

सातारा : शहरालगत असणाऱ्या गोडोली येथे तिघांना मारहाण करून एकाच्या पायावर चारचाकी घालून जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ...

He hit the wheel of the car | मारहाण करून कारचे चाक पायावर घातले

मारहाण करून कारचे चाक पायावर घातले

सातारा : शहरालगत असणाऱ्या गोडोली येथे तिघांना मारहाण करून एकाच्या पायावर चारचाकी घालून जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हर्षल शेख, आकाश चव्हाण आणि अन्य एकाचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राजेश कृष्णा लवळे (वय २२, रा. अजंठा चौक, मोरे कॉलनी, रहिमतपूर रोड, गोडोली, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हर्षल शेख (रा. इंदिरानगर, गोडोली, सातारा), आकाश चव्हाण आणि अन्य एक अनोळखी असे तिघेजण गॅरेजसमोर आले आणि विशाल कांबळे याला आमच्या गाडीचे काम झाले का? असे विचारले असता विशाल यांनी ‘तुमची गाडी आमच्याकडे कामासाठी लावली नाही,’ असे सांगितले. यामुळे या तिघांनी विशाल आणि राजेश या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यास आलेल्या सदानंद याच्या डोक्यात दगड मारला तर बेदरकारपणे कार चालवत अमोल कदम यांच्या उजव्या पायावर घालून त्यांना जखमी केले. या प्रकरणी राजेश यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एम. एस. मेचकर करीत आहेत.

Web Title: He hit the wheel of the car