शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

खुशी लेके आया चॉँद ईद का!

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

खरेदीसाठी गर्दी : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला सुका मेवा, कपड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल

जावेद खान - सातारा -रमजान महिन्यात महिनाभर उपवास ठेवल्यानंतर या उपवासाची सांगता रमजान ईदने होते. गेल्या एक आठवड्यापासून बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ईदसाठी सातारकर सज्ज झाले आहेत. ईदचा दिवस हा बक्षिसाचा दिवस असतो. त्यामुळे गरीब व्यक्ती देखील ईद चागंल्या प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न करतात. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठत सुका मेवा, विविध प्रकारचे अत्तर, टोप्या, जॅकेट, महिलांसाठी अनारकली ड्रेस, विविध शोभेच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती.चंद्र दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी समाजात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी नमाज पठणाअगोदर जकात, कितरा व सदका (दान) देण्यात येते. आपापसातील मतभेद दूर करून बंधूभावाने राहण्यासाठी ईदच्या दिवशी गळाभेट करण्यात येते. त्यानंतर मनाचा गोडवा कायम राहावा, यासाठी ईदचा खास मेनू असणारा शिरखुर्मा दिला जातो. समाजातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, या उद्देशातून या महिन्यात मोठ्या प्रमाणात आपल्या कमाईतील काही रक्कम गरजू व गरीब लोकांना देण्यात येते. ‘ईद’ हा आनंदाचा व देवाकडून बक्षीस मिळण्याचा दिवस आहे. हा दिवस आठवणीत राहावा म्हणून घराच्या रंगरंगोटीपासून सर्व तयारी करण्यात आली आहे. १७ टन गहूवाटपरमजान महिन्यात उपवास ठेवून ईदच्या नमाज पठणाअगोदर ‘कितरा’ म्हणजेच गहू गरिबांना वाटला जातो. २७ व्या उपवासापासूनच गरिबांना गहूवाटप केला जातो. लहान असो, वा मोठा. प्रत्येकाला या महिन्यात अडीच किलो गहूवाटप करावाच लागतो. जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यात सुमारे १७ टन म्हणजेच १७ हजार किलो गहूवाटप करण्यात आला आहे.गरिबांनी घेतला जकातीचा लाभमुस्लीम समाजात मिळकतीच्या अडीच टक्के रक्कम ही ‘जकात’ म्हणजेच धार्मिक कर म्हणून देण्यात येते. जिल्ह्यातील गरीब व गरजू लोकांना ही जकात देण्यात येते. सोने-चांदीच्या आजच्या दराच्या अडीच टक्के रक्कमही धार्मिक कर म्हणून देण्यात येते. आजारी व्यक्तीला औषधोपचार, कपडे, धान्य अशा स्वरूपातही जकात दिली जाते.