शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार यांच्या मदतीला सरसावले हात

By admin | Updated: August 20, 2016 22:50 IST

मार्डीकरांनी दाखवली माणुसकी : ‘सोशलमिडिया’ची किमया -- गुड न्यूज

पळशी : सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी व योग्य पद्धतीने केला तर मदतीचे शेकडो हात सरसावतात आणि माणुसकीचे दर्शन घडवतात असेच उदाहरण मार्डी, ता. माण येथे पाहावयास मिळाले.मार्डी, ता. माण येथील विलास रामचंद्र कुंभार हे एसटीत चालक म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत तर मुलगा अकरावीत शिकतो आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी अनिता कुंभार (वय ४२) यांना पॅरालिसीसचा अ‍ॅटॅक आला आणि त्याचा परिणाम मेंदूवर होऊन मेंदूच्या शिरा फुटल्याने त्यांना सातारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथे त्यांच्या मेंदूचे आॅपरेशन करण्यात आले. त्यासाठी सुमारे पाच लाखांवर खर्च झाला.विलास कुंभार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून, त्यांना शेतीही नाही. दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाच्या ओझ्यात ते पुरते बुडले असतानाच पत्नीच्या आजारपणाने त्यांना हतबल केले. पैसा येण्याचे इतर कोणतेच साधन नसल्याने पत्नीला जगवायचे कसे? या विवंचनेत असतानाच मार्डीतील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले.मार्डी येथील अभय पोळ या युवकाने विलास कुंभार यांना मदत मिळण्यासंदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट ‘मार्डी ग्रामविकास’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. ही पोस्ट गेल्या आठ ते दहा दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरील विविध ग्रुपवरून वेगाने फिरत होती. तसतसा मार्डी ग्रामस्थांतून मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी जमेल तेवढी व जमेल तशी मदत त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावर तर काहींनी सातारा येथील मंगलमूर्ती केअर टेकर या सध्या उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दिली.अनिता कुंभार यांचा रोजचा उपचाराचा खर्च तीन ते चार हजारांच्या घरात आहे. अशावेळी डॉ. माधव पोळ, पांडुरंग पोळ, उत्तम काळे, हिंदुराव पोळ, महेश पोळ, रामदास काटकर, नारायण नारायणे, पांडुरंग घाडगे, शिवाजी पोळ, दशरथ पोळ, दीपक पोळ आदींसह ग्रामस्थ मदत पाठवत आहेत तर आणखी मदत मिळण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)लोकांच्या मदतीमुळेच मला माझ्या पत्नीचा इलाज करता येतोय. देवदूत होऊन मला आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांचा मी खरोखरच आभारी आहे.- विलास कुंभार, मार्डी