शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’ योजनेच्या पाण्यासाठी घेराओ

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

मालगावमध्ये आंदोलन : शेतकरी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ

मालगाव : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाखा अभियंत्याला घेराओ घालत मालगाव (ता. मिरज) येथील संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हात मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. शेतकऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. दीड तास रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनीच शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडून वीस दिवस झाले तरी बेकायदेशीर पाणी उपशामुळे गेट क्र. १३, १४ व १५ वरील शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी बेकायदेशीर पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ४ रोजी मालगाव बंदचा व पंढरपूर रस्ता रोकोचा इशारा दिला होता. तहसीलदार, ग्रामीण पोलीस ठाणे व म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले होते. याची दक्षता घेऊन कळंबी शाखा कालव्याचे अधिकारी निकम हे मालगाव ग्रामपंचायतीत आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराओ घालून धारेवर धरले. पैसे घेऊन एका शेतकऱ्याला अनेकवेळा पाणी देता, त्यामुळे आम्हाला योजनेचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. अधिकारी निकम यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकरी संतप्त झाले. पाणी जोपर्यंत मिळत नाही, तो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून सोडणार नाही, प्रसंगी डांबून ठेवण्याच्या निर्णयापर्यंतही टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याबाबत कोणतीच उपाय योजना होत नसल्याने माजी सरपंच प्रदीप सावंत, सरपंच महावीर रुकडे व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले व त्यांनी मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने मिरज ग्रामीण पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अचानकपणे घेतलेल्या आंदोलनाला हरकत घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनीच अधिकारी निकम व शेतकऱ्यांत मध्यस्थी केली.त्यानंतर कळंबी शाखा कालव्यावरील होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरूकरण्यात आल्या. (वार्ताहर)