शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले!

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

कर वसुली स्थगित : गावा-गावांत वाढल्या अडचणी; निर्णय लवकर घेण्याची मागणी

खटाव : गावातून विविध मार्गांने मिळणारा कर हा ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा आहे. परंतु क्षेत्रफळावर आधारित या करवसुलीस उच्च न्यायालयाने दि. १ एप्रिलपासून स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. करआकारणी व वसुली न झाल्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत राब्रवल्या जाणाऱ्या नागरी सुविधा ठप्प होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. ऐन दिवाळीत बोनस तर सोडाच थकित पगारातील जेमतेम एखाद्या महिन्याचा पगार देतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. घर कराच्या फेरआकारणीची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील घर करांची वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. या कारणामुळे सर्वच ग्रामपंचायती आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. आणि याचा परिणाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मानधनावर झाला आहे. आतापर्यत सर्वच ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रफळावर आधारित करआकारणी केली जात होती. याच्याविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत निर्णय देताना उच्च न्यायालयाने सध्याच्या करवसुलीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कर आकारणीचे स्वरूप निश्चित करण्यासाठी शासनाकडून अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गावपातळीवरून शिफारशी मागवल्या आहेत. या शिफारशी आल्यानंतर त्याचा अभ्यास समिती करून याबाबत पुढील धोरण आखले जाणार आहे. आधीच ग्रामपंचायतींना मिळणारे उत्पन्न अल्प असते. या आलेल्या करातूनच वीजबिल भरणे महत्त्वाचे आहे. कर न आल्यास ते भरल्या नसल्याने विजेबरोबरच पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेषत: ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही याच कर आकारणीतून केले जातात. आणि उच्च न्यायालयाच्या या करवसुली थांबवण्याच्या आदेशामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडत आहेत. शासनाने उपाय काढण्याची मागणीशासनाने यावर योग्य तो पर्याय शोधून करवसुली सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत पातळीवर जोर धरू लागली आहे. चालू आर्थिक वर्षातील कर वसुली पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. दैनंदिन खर्च कसा भागवावा हा प्रश्न आता सर्वच ग्रामपंचायतीसमोर उभा राहिला आहे.