शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यामुळे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : जिल्ह्यात कांद्याची आवक कमी असून सातारा बाजार समितीत तर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांना अच्छे ...

सातारा : जिल्ह्यात कांद्याची आवक कमी असून सातारा बाजार समितीत तर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ लागले आहेत. तर भेंडी अन् शेवग्याचाही भाव तेजीत आहे. मात्र, कोबी, टोमॅटो व फ्लॉवरला दर कमीच मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो.

सातारा बाजार समितीत बुधवारी कांद्याला क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत गेला. तर हलक्या प्रतिच्या कांद्याला २ हजारापर्यंत भाव आला. यामुळे कांदा महाग होऊ लागल्याचे दिसत आहे. साताऱ्यातील मंडई तसेच दुकानातही कांदा विक्रीचा दर ६० रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. यामुळे सामान्यांच्या खर्चात वाढच झाली आहे.

सातारा बाजार समितीत बुधवारी ५५ वाहनांतून ३७८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४७ क्विंटलची आवक झाली. तर बटाटा ४१, लसूण १६ आणि आल्याची ९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली. बाजार समितीत गवारला १० किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवगा शेंगेला ४०० ते ५०० रुपये भाव आला. शेवगा शेंगेच्या दरात वाढ झाली आहे. तर वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ५० ते ७०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० अन् दोडक्याला ३०० ते ४०० रुपये दर आला.

बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांदरम्यान दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.

चौकट :

पालेभाज्यांची आवक जेमतेम...

सातारा बाजार समितीत बुधवारी पालेभाज्यांची आवक जेमतेम झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात चढ-उतार होता. मेथीच्या १३०० पेंड्यांची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १२०० पेंडी आली. याला शेकडा दर ४०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला.

......................................................