शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिलेटिन स्फोटाचा तपास सीबीआयकडे द्या

By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST

जयकुमार गोरे : शेखरवर कारवाई झालीच पाहिजे; संबंधित पवनचक्की कंपन्यांवर गुन्हा का नाही ?

सातारा : बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे होत नसून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा सीआयडीकडे देण्याची मागणी बोथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी आम्ही पालकमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन देणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ग्रामस्थ भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आ. गोरे म्हणाले, ‘बोथे येथील स्फोट अवैध जिलेटिन साठ्यामुळे झाला आहे. हा साठा करण्याचा अधिकार, परवाना बोथे विंड मिल अथवा त्याच्या सहयोगी कंपन्याकडे नव्हता. पोलीस अधीक्षकांनाही तसे म्हटल्याचे माझ्या वाचनात आले. हा साठा ज्या कंपन्यांनी केला त्यांनी बोथे येथील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात पहिल्याच दिवशी दाखल झालेली फिर्याद लक्षात घेता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. तरीही पोलीस तपासात बदल होईल, असा आशावाद होता. मात्र, ज्या ‘कमल एंटरप्रायजेस’ कंपनीवर गुन्हा दाखल केला ती कंपनी येथे काम करत होती का, याची खातरजमाही पोलिसांनी केली नाही.
आ. गोरे म्हणाले, ‘कमल एंटरप्रायजेस’ येथे काम करत नाही. तत्कालीन भागीदार अंकुश गोरे यांनी ‘बोथे विंड फार्मा’ आणि ‘स्कायझेन’चे अरविंद बन्सल यांना मी आता येथे काम करत नसल्याचे सांगून आपण येथून पुढे या डोंगरावर बेकायदेशीर काम करू नये, असे पत्राद्वारे कळविले होते. त्याचबरोबर अंकुश गोरे यांनी वकिलामार्फत दुसरे भागीदार शेखर यांना येथे बेकायदेशीर काम करू नये, अशा आशयाची नोटीस दोनवेळा बजावली. यानंतर अंकुश गोरे यांनी ‘कमल एंटरप्रायजेस’मधील भागीदारी संपुष्टात आणली असल्याचे सांगत ठाणे येथील न्यायालयात दावा दाखल केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना होती. तरीही त्यांनी अंकुश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मात्र, हे करत असताना येथे सद्य:स्थितीत काम करणाऱ्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची तसदी मात्र घेतली नाही.’ प्रायजेस’ने तर ५५ पवनचक्क्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ने बसविल्या. मात्र, या दोन कंपन्यांचे नाव कोठे येणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली असल्याचा आरोप करून आ. गोरे म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणात आर्थिक तडजोड असल्याची शक्यता आहे. ‘आर्यन’ कंपनीला कोणी नेमले याचा तपास पोलिसांनी केला का? आणि येथे सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचे काम कोणाकडे होते, याचा शोध जर पोलिसांनी घेतला तर जिलेटिनचा साठा कोणाचा होता, याचे उत्तर पोलिसांना मिळेल. मात्र, पोलीस तपास करत नाहीत. याप्रकरणात ज्यांचा संबंध नाही, अशा अंकुश गोरे यांना अटक केली. जे सत्य आहे, ते समोर आलेच पाहिजे. यातून कोणी सुटता कामा नये.’ (प्रतिनिधी)

वारुगड येथील अवैध साठ्याचे काय झाले?
बोथे डोंगरावर ज्यावेळी घटना घडली त्याचवेळी संबंधित कंपनीचा वारुगड येथील कार्यालयात आणखी अवैध जिलेटिन साठा होता आणि तो येथून तत्काळ हलविला असल्याचा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला. गोरे म्हणाले, ‘याची कल्पना मी पोलिसांना दिल्यानंतरही ते येथून वारुगडला जायला तयार झाले नाहीत. त्यांना कारण विचारले तर गाडी नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून आले. मात्र, तशी परिस्थिती नव्हती. येथे अनेक गाड्या होत्या. तरीही पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यास विलंब केला,’ असेही गोरे म्हणाले.


मुदगल म्हणतात, लेखी हवे...
माण तालुक्यातील बोथे येथील जंगला नामक डोंगरावर घटना घडल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मीही उपस्थित होतो. आमदार या नात्याने मी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे बोथे येथील डोंगरावर सुरू असलेल्या कामकाज, अवैध जिलेटिन साठा याच्या अनुषंगाने तक्रार केली. याचवेळी येथे उपस्थित असणारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल ‘मला लेखी तक्रार द्या,’ असे सांगतात. मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. आमदारांकडेच जर ते लेखी द्या म्हणत असतील तर अवघड आहे, अशी खंतही आमदार गोरे यांनी व्यक्त केली.