शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलींची छेड अन् मुलांचा राडा!

By admin | Updated: August 10, 2015 23:59 IST

प्रवासातील चित्र : युवकांमधील शीघ्रकोपी वृत्ती ठरतेय पोलिसांची डोकेदुखी-महाभारत प्रवासातले...

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मनोमिलनाचा करिष्मा आणखी एकदा स्पष्ट झाला. १९ जागांपैकी सर्वच जागा जिंकत पुन्हा एकदा बाजार समितीत मनोमिलनाचीच सत्ता आली. मनोमिलनाला शह देण्याचे नाराजांचे मनसुबे धुळीला मिळाले. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी ९० टक्के मतदान झाले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांच्या उपस्थितीत भूविकास बँकेच्या सभागृहात मतमोजणी झाली. निकाल बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाच्या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे नितीन कणसे (१५८२), रमेश चव्हाण (१५९२), चंद्रकांत जाधव (१५९४), विक्रम पवार (१५६३), किरण साबळे (१५९५) यांनी तर खासदार उदयनराजे भोसले गटाचे बाबासो घोरपडे (१५९७), हेमंत सावंत (१५४९) यांनी विजय मिळविला. अनिल साळुंखे यांचा पराभव झाला.ग्रामपंचायत गटामध्ये आमदार गटाचे श्रीरंग देवरुखे (११६४) तर खासदार गटाचे सतीश माने (११३६) व आर्थिक दुर्बलमध्ये अशोक चांगण यांनी विजय मिळविला. अभय पवार, जयवंत मोरे यांचा पराभव झाला.आडते व व्यापारी गटात आमदार गटाचे सुनील झंवर (७०६), खासदार गटाचे सोमनाथ धुमाळ (६१३) यांनी राहुल घाडगे, राजन चतूर, दिलीप ताटे यांचा पराभव केला. आमदार गटाचे नानासाहेब गुरव (इतर मागास), रघुनाथ जाधव (भटक्या जमाती), शैलेंद्र आवळे (अनुसूचित जाती-जमाती), अनिल जाधव (हमाल-तोलारी), शालन कदम (महिला राखीव), खासदार गटाचे शंकरराव किर्दत (कृषी प्रक्रिया), अलका पवार (महिल राखीव) यांची या आधीच बिनविरोध निवड झाली होती. विरोधकांना तीन अंकी मतांच्या वर पल्ला गाठता आलेला नाही. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत जल्लोष केला. तसेच शहरात विजयी मिरवणूक काढली. (प्रतिनिधी)७ उदयनराजे तर १२ जागा शिवेंद्रराजे गटाकडेसातारा बाजार समितीच्या १९ जागांपैकी १२ जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तर सात जागा खासदार उदयनराजे गटाला मिळाल्या आहेत. स्वीकृत सदस्यांमधून खासदार गटाच्या आणखी दोन जागा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विजयानंतर भाऊसाहेब महाराजांना अभिवादनसातारा बाजार समितीत विजयी झालेल्या सर्व नूतन संचालकांनी दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वेदांतिकाराजे भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती नारायणराव कणसे, जेष्ठ नेते अ‍ॅड. लालासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, पंचायत समितीचे उपसभापती सुर्यकांत पडवळ, पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे, माजी जि. प. सदस्य सुनिल सावंत, पद्मासिंह फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.