घंटागाडी दारात तरी कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:55+5:302021-06-18T04:26:55+5:30

वाई : सिद्धनाथवाडी-जेजुरीकर कॉलनी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर स्वयंघोषित कचरा डेपो तयार झाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा ...

Garbage on the street though at the bell door | घंटागाडी दारात तरी कचरा रस्त्यावर

घंटागाडी दारात तरी कचरा रस्त्यावर

वाई : सिद्धनाथवाडी-जेजुरीकर कॉलनी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर स्वयंघोषित कचरा डेपो तयार झाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाई - एकसर रस्त्यावर सिद्धनाथवाडी ते जेजुरीकर कॉलनी रस्त्यावर अनेक नागरिक येता-जाता मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. हे नागरिक घंटागाडी नियमित दारात येत असूनही त्यात कचरा टाकण्याची तसदी घेत नाहीत. यामुळे सिद्धनाथवाडी-जेजुरीकर कॉलनी रस्त्याला बकाल स्वरूप आले असून, सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. सकाळी, संध्याकाळी या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे. याचा नागरिकांना विसर पडताना दिसत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांवर पालिका प्रसासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

(चौकट)

म्हाळू खंडू कॉलनी ते जेजुरीकर रस्ता तसेच परिसरातील ओढ्यात नागरिक कचरा टाकत असल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पालिकेकडून घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही नागरिक रस्त्यावर, ओढ्यात कचरा टाकतात. अशा नागरिकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

- शंकर वाघ, सिद्धनाथवाडी

फोटो : १७ वाई

वाई येथील सिद्धनाथवाडी-जेजुरीकर कॉलनी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)

Web Title: Garbage on the street though at the bell door