शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांची टोळी पिस्तुलासह जाळ्यात

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

४६ काडतुसे सापडली : महामार्गावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याची दिली कबुली

सातारा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पिस्तूल, ४६ जिवंत काडतुसे आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यांचे वाहनही ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे दीड महिन्यापूर्वी महामार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. पुण्याहून साताऱ्याकडे काही जण दरोड्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ जीपमधून येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्मााकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर नाकाबंदी केली होती. म्हसवे गावच्या हद्दीत महामार्गावर सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि कर्मचारी रस्त्याच्या दुतर्फा दोन पथके करून दबा धरून होते. स्कॉर्पिओ जीप येताच ती थांबविण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी केला. परंतु जीप न थांबता चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. चालक पोलीस कॉन्स्टेबल मारुती अडागळे यांनी पोलिसांची सुमो जीप स्कॉर्पिओला आडवी मारून स्कॉर्पिओ थांबविली. गाडीतील तीन जण उतरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु झाडा-झुडपाचा आधार घेऊन ते पळून गेले. तथापि, स्कॉर्पिओ गाडीतील अन्य तिघांना पोलिसांनी पकडले. अनिल रामचंद्र आढाव (वय ४३, रा. देहूरोड, पुणे), सुभाष नटराज पुजारी (वय ३४, रा. वेल्लूर, जि. त्रिनोली, तमिळनाडू) आणि अमित धीरूभाई पटेल (वय ३३, रा. कौपरखैरणे, बोनखाडेगाव, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता अनिल आढाव याच्या पँटमध्ये खोवलेले बिगरपरवाना पिस्तूल पोलिसांना सापडले. पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये सहा राउंड होते. जीपमध्ये काळ्या रंगाची सॅक होती. त्यात पक्कड, स्क्रूड्रायव्हर, मिरची पावडरचा पुडा, चार मोबाइल असा मुद्देमाल सापडला. सॅकमधील रुमालात एक मॅगझीन आणि चाळीस जिवंत काडतुसे सापडली. या मुद्देमालाची किंमत ६ लाख ११ हजार रुपये इतकी आहे. आपण दरोडा टाकण्यासाठी चाललो होतो, अशी कबुली या तिघांनी दिली. या तिघांसह सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी करणे आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक दत्तात्रय नाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)