शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्टाईल चोरट्यांच्या टोळीचा छडा

By admin | Updated: September 15, 2014 23:26 IST

दोन आरोपी अटकेत : वृद्ध महिलांचे दागिने हिसकावले, सहा गुन्ह्यांची कबुली

उंडाळे : साळशिरंबे, ता. कऱ्हाड परिसरात धूमस्टाईलने लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. पथकाने आत्तापर्यंत टोळीतील दोघांना अटक केली असून, शिराळ्यातील एकाला रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. दीपक विश्वास देवकर (वय २३), विशाल सुरेश उथळे (वय २०, दोघेही रा. भाटवाडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशिरंबे परिसरात गत काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अशातच दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गावातील नर्मदा तुकाराम सावंत (वय ६५) ही महिला नागझरी शिवारात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन युवक त्याठिकाणी आले. नर्मदा सावंत यांच्याजवळ त्यांनी दुचाकी थांबविली व नजीकच्या एका शेतजमिनीकडे हात करून संबंधित जमीन कोणाच्या मालकीची आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी नर्मदा यांनी जमिनीच्या मालकाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित युवक दुचाकीवरून काही अंतरावर गेले. तेथून परत येत त्यांनी नर्मदा यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सुमारे १४ हजार किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. नर्मदा सावंत यांनी आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर तासाभरातच परिसरात आणखी एका ठिकाणी या टोळीने हातसफाई केली. गावापासून काही अंतरावर साळशिरंबे-पाचुंब्री मार्गावरून जनावरे घेऊन शेताकडे निघालेल्या सुमन अधिक साठे (वय ५८) या महिलेच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सुमारे १४ हजार किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाईल चोरट्यांनी हिसकावले व तेथून पोबारा केला. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी या टोळीतील दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. (वार्ताहर)