शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी विकली ताजी भाजी

By admin | Updated: April 13, 2015 00:04 IST

किरपेत बालबाजार : बालगोपाळांच्या धिटाईने ग्रामस्थही हरखले

तांबवे : किरपे, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजाराने सर्वच ग्रामस्थ भारावून गेले. बाजारामध्ये आपल्या पाल्याने आणलेल्या भाजी विक्रीतून त्यांना आर्थिक ज्ञानाची माहिती मिळत असल्याने या उपक्रमांबाबत ग्रामस्थांनी कौतुक केले. शासनाच्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा प्राथमिक शाळेतच होतो. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दृष्टीने किरपे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांच्या भाजीपाला बाजाराचे आयोजन बुधवारी करण्यात आले. जिल्हा परिषद शळेत भरलेल्या बाजारात वांगी, शेवगा, मेथी, आंबे, चवळी, वडापाव, भजी अशा विविध पदार्थांची विक्री मुलांनी केली. त्याच्या खरेदीसाठी गावातील तरुणवर्ग, महिलावर्ग, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. किरपे परिसरात तांबवे येथे आठवड्यातून एकदा शनिवारी बाजार भरतो. त्यानंतर नागरिकांना आठवडाभर भाजी पुरवावी लागते. मात्र, बुधवारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारामुळे नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारामुळे नागरिकांनी ताजी भाजीपाला घेता आल्याने अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करावे, असेही ग्रामस्थ, महिलांनी सांगितले. शाळेत भरवलेल्या बाजारासाठी शिक्षक एस. व्ही. सरगडे, पी. डी. कारंडे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) ५स्वस्त भाजीला मोठी मागणीकिरपे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा मोठा बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात लहान मुलांनी स्वस्त दराने ताजी भाजी विकण्यासाठी आणली असल्याने त्याची ग्रामस्थांकडून ही आवडीने खरेदी करण्यात आली.आमच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे भरवलेल्या बाजारात मी आमच्या शेतातील भाजी विकली. त्यातून मला पैसे मिळाले. नफा-तोटा, खरेदी-विक्रीचा या बाजारामुळे मला अनुभव मिळाला.- मंगेश गुरव, विद्यार्थी