Satara: फलटणच्या यशवंत बँकेत ११२ कोटींचा गैरव्यवहार, शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:08 IST2025-10-13T15:08:24+5:302025-10-13T15:08:55+5:30

सहकार क्षेत्रात खळबळ

Fraud of Rs 112 crores in Phaltan Yashwant Bank, case against 50 people including Shekhar Charegaonkar | Satara: फलटणच्या यशवंत बँकेत ११२ कोटींचा गैरव्यवहार, शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा

Satara: फलटणच्या यशवंत बँकेत ११२ कोटींचा गैरव्यवहार, शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा

कराड : फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत झालेले लेखापरीक्षण व १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण कालावधीत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे,

प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुन्द्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर,

विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सुरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.

यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व नातेवाईकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ यादरम्यान यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रकमेचा त्यांनी अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणे करून या प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता अर्ज वितरण केले. बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, याबाबत संस्थेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भ्रमणध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत.

Web Title : सतारा: यशवंत बैंक में 1.12 अरब का घोटाला, 50 पर आरोप

Web Summary : फलटण के यशवंत को-ऑपरेटिव बैंक में ₹112 करोड़ का घोटाला सामने आया। पूर्व अध्यक्ष शेखर चरेगांवकर और 49 अन्य पर धोखाधड़ी के आरोप लगे हैं। सहकारी क्षेत्र में इस घोटाले से खलबली मची हुई है, क्योंकि फर्जी ऋण और जाली दस्तावेज इस्तेमाल किए गए।

Web Title : Satara: 1.12 Billion Embezzlement at Yashwant Bank, 50 Charged

Web Summary : A ₹112 crore embezzlement was uncovered at Yashwant Co-operative Bank, Falton. Former chairman Shekhar Charegaonkar and 49 others face charges for the fraud. Bogus loans and fabricated documents were used in the scheme, causing turmoil in the cooperative sector.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.