Satara: शासकीय नोकरी लावण्याच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:58 IST2026-01-29T18:58:07+5:302026-01-29T18:58:49+5:30
सातारा : महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली पत्रे दाखवून, शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साताऱ्यासह बीड व हिंगोली जिल्ह्यांतील सात ...

Satara: शासकीय नोकरी लावण्याच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
सातारा : महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली पत्रे दाखवून, शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साताऱ्यासह बीड व हिंगोली जिल्ह्यांतील सात जणांकडून एकूण १ काेटी २ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या फिर्यादीनुसार सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप विठ्ठल रांजणे, असे त्याचे नाव आहे.
याबाबत विठ्ठल प्रल्हाद रामदासी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुनील विठ्ठल रांजणे (रा. तामजाईनगर) हे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली विविध मराठी भाषेतील पत्रे दाखवून फिर्यादीचा मुलगा स्वानंद विठ्ठल रामदासी, मुलगी पल्लवी रामदासी यांची १० लाख, तसेच त्यांच्या ओळखीचे लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथील एक जणाकडून १० लाख,
भगवान नागरगोजे (रा. नगररोड, जि. बीड) यांचे १५ लाख, रमेश कानडे (रा. खोंडरस, ता. बीड) यांचे १५ लाख, रवीकुमार जोशी (रा. कण्हेरगाव, जि. हिंगोली) यांचे २२ लाख, शिवाजी शिंदे (रा. हिंगोली) यांचे १५ लाख आणि कमलाजी खंदारे (रा. हिंगोली) यांचे १५ लाख, असे एकूण १ कोटी २ लाख रुपये वेळोवेळी एका हॉटेलच्या पार्किंगच्या परिसरात घेतले; परंतु नोकरीला न लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.