शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही ...

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही नोंदविला.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाºया कास पठाराने आपल्या दुर्मीळ व विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली आहे. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयात देखील येथील फुलांनी आपले स्थान पक्के केले आहे. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत. चालू हंगामात आतापर्यंत स्वीझर्लंड, रशिया या देशातील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला असून, पठाराचे सौंदर्य आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले आहे. एवढेच नव्हे परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी आपल्या भाषेत फुले खूप सुंदर असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे.सध्या पठारावर गेंद, सीतेची आसवे ही फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असल्याने बहुतांशी ठिकाणी पांढºया व जांभळ्या फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहे. अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी, ड्रॉसेरा, कंदील पुष्प आदी प्रकारच्या फुलांना बहर आला असून, हजारो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.गतवर्षी फुले पाहण्यासाठी रशिया, जपान, अमेरिका, इग्लंड, जर्मनी आदी देशांतील पर्यटकांनी कासला भेट दिली होती.यवतेश्वर घाटात वाहनांच्या रांगासाताºयाहून कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. शनिवार व रविवार सलग सुट्या असल्यामुळे राज्यभरातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्तापही सहन करावा लागला. कासकडे जाताना व कासहून पुन्हा साताºयाकडे येताना यवतेश्वर घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे मंदावली. चार किलोमीटर लांबीचा घाट उतरण्यासाठी पर्यटकांना अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागला.