कऱ्हाडातील झेंडे टाेळी दोन वर्षांसाठी तडिपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:08+5:302021-01-08T06:07:08+5:30

चौघांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार ...

The flags of Karhada were hoisted for two years | कऱ्हाडातील झेंडे टाेळी दोन वर्षांसाठी तडिपार

कऱ्हाडातील झेंडे टाेळी दोन वर्षांसाठी तडिपार

चौघांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे सादर केला होता. या हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होऊन त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातील हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबतचा आदेश केला आहे.

या टोळींने वेळोवेळी गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी, जबरी चोरी, सरकारी नोकरास मारहाण करून गंभीर जखमी करणे असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती, हद्दपार प्रस्तावाची सुनावणी चालू असलेल्या कालावधीतही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता जनतेमधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती.

Web Title: The flags of Karhada were hoisted for two years