शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतीसाठीचा पहिला दिवस मोकळाच

By admin | Updated: March 17, 2016 23:35 IST

लोणंद निवडणूक : ४१ अर्जांची विक्री; अनेकांचे लक्ष मुहूर्ताकडे, दि. १७ एप्रिल रोजी मतदान --लोणंदचं रणकंदन

लोणंद : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या व प्रथमच निवडणूक होत असणाऱ्या लोणंद नगरपंचायतीसाठी पहिल्या दिवशी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र, तब्बल ४१ अर्जांची विक्री झाली आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधला आहे. दरम्यान, नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट आहे. लोणंद नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. प्रथमच ही निवडणूक होत आहे. दि. २२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दि. ४ एप्रिलला माघार घ्यायची मुदत असून, दि. १७ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून लोणंदमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा रंगू लागली आहे.  लोणंद नगरपंचायतीसाठी दि. २२ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. १७ प्रभागासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार हा अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. १७ तारीख असल्याने व ती खतऱ्याची घंटा ठरू नये, यासाठी इच्छुकांनी एकही अर्ज दाखल केला नाही; मात्र दिवसभरात ४१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी विविध कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रे जुळविण्यासाठी अनेकांची धावपळ होताना दिसून येत आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीनेही जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या कार्यालयातच उमेदवारी अर्ज विक्री, वसुली विभाग, उमेदवारी अर्जासंदर्भातील सर्व कागदपत्रे विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, येथील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दि. २२ रोजीच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही कंबर कसली आहे. (वार्ताहर) कर वसुली जोरात...-नगरपंचायतीची निवडणूक आहे. अनेक इच्छुक अर्ज भरण्यासाठी तयार झाले आहेत. निवडणूक लढविताना थकबाकी नसल्याचे दाखले द्यावे लागतात. सध्या अनेक इच्छुक थकबाकी भरून दाखले घेत आहेत. त्यामुळे कर वसुली जोरात असल्याचे दिसत आहे. अर्ज भरण्याचा दिवस व वेळ... -अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेतला आहे. अर्ज भरण्याचा दिवस व वेळ ठरविण्यात आली आहे. ज्योतिषांकडून सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सकाळी ९ ते दुपारी एकपर्यंत वेळ चांगली असल्याचे सांगितली गेली आहे. त्यामुळे संबंधित दोन दिवशी अधिक अर्ज दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे.