शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन यंत्रणेची दमछाक

By admin | Updated: February 7, 2015 00:10 IST

हिंगणेची भीषण आग आटोक्याबाहेर : बघ्यांना हलविताना पोलिसांची तारांंबळ

वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील खासगी खटाव-माण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग या बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीच्या साठा असणाऱ्या टाकीला भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये येथील कामगार सागर कृष्णा जगदाळे (वय २७, रा. राजाचे कुर्ले) हा जागीच ठार झाला.शुक्रवारी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास सागर जगदाळे हा वेल्डिंग कारागिर तेथील सहा टाक्यांपैकी एका टाकीवर वेल्डिंगचे काम करीत होता. प्राथमिक अंदाजानुसार ही आग वेल्डिंगच्या ठिणगीने लागली असल्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, या परिसरात आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. या घटनेची माहिती समजताच हिंगणे गावातील व वडूज येथील रानमळा परिसरातील लोकांनी धाव घेतली. परंतु, तत्पूर्वीचे या आगीच्या स्फोटामुळे टाकीचे झाकणासहित सागर जगदाळे दोनशे मीटर उडून जागीच मृत्यू पावला. घटनास्थळावरील आग आटोक्यात आणण्यासाठी फलटण नगरपरिषद, म्हसवड, नगरपालिका व गोपूज येथील ग्रीन पॉवर अ‍ॅण्ड शुगरचे अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या टाकीमध्ये केमिकल मिश्रितसारखे पदार्थ असल्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला. मात्र, आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. त्यावेळी शेजारीच असणाऱ्या दुसऱ्याही टाकीला आग लागली.या आगीचे स्वरूप लक्षात घेता आणि आग आटोक्यात येण्याची शक्यता नसल्याचे पाहून प्रशासनाने जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अग्निशमन दलास पाचारण केले. आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. सहा टाक्यांपैकी दोन टाक्यांने आग लागल्याने उर्वरित टाक्यांपासून शेजारी उभ्या आॅईलचा टँकर तातडीने घटनास्थळावरून हलविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गेआदी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर होते. (प्रतिनिधी)