शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बांधकामास मुहूर्त..

By admin | Updated: August 17, 2015 00:13 IST

कऱ्हाड बसस्थानकाची मुख्य इमारत पाडली : जेसीबीच्या साह्याने युद्धपातळीवर कामास प्रारंभ

कऱ्हाड : येथील बसस्थानकाच्या बांधकामास हिरवा कंदील मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अधिकृतपणे बसस्थानकाच्या जुन्या इमारतीवर संबंधित ठेकेदाराने हातोडा मारला. दोन जेसीबी, डंपर तसेच कामगारांचा लवाजमा सोबत घेऊन बांधकाम अधिकारी व ठेकेदारांनी बसस्थानकाची मुख्य इमारत पाडली. गुरुवारपासून सुरू केलेल्या इमारत पाडण्याचा काम हे आठ-दहा दिवस चालणार आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या इमारत बांधकामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. बसस्थानक बांधकामास शासनाकडून अधिकृतपणे हिरवा कंदील मिळाल्यानंतर रविवार, दि. ९ आॅगस्ट रोजी संबंधित ठेकेदाराने बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी ताबा घेतला. त्यातून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम अधिकारी व ठेकेदारांनी अधिकृतपणे बसस्थानक इमारत पाडण्यास प्रारंभ केला. बसस्थानकातील कोल्हापूर मार्गाकडे जाणाऱ्या फलाटाच्या इमारतीकडील बाजू पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बांधकामास अडथळा येऊ नये म्हणून बांधकाम विभागाकडून इमारतीभोवती पत्र्याचे कुंपण उभारण्यात आले आहेत.आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी असताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून ११ कोटी बसस्थानकाच्या बांधकामास मंजूर केले. त्यातून हे बांधकाम केले जात आहे. कऱ्हाड येथील बसस्थानकातील पाडण्यात आलेल्या बांधकामाचे साहित्य हे शहराबाहेर टाकण्यासाठी पालिकेकडून बसस्थानक प्रशासनास जागा देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणाहून अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईल अनेक बस धावत असतात. आता शहरात बस येणार नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. बसस्थानकातील जागेच्या उपलब्धतेअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) ‘मनसे’ची बसस्थानकाबाबत चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीकऱ्हाड बसस्थानकातील इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू असल्याने त्याचा त्रास हा प्रवासी व विद्यार्थ्यांना होत आहे. कोल्हापूर नाका येथे प्रवाशांना बसमधून उतरविले जात असल्याने प्रवाशांना पैसे खर्च करून शहरात यावे लागत आहे. तरी प्रवासी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास हा कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाने कोल्हापूर नाका ते शहर बस सुरू करावी, या प्रश्नाबाबत सहकारमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी निवेदन दिले. कऱ्हाड आगाराची स्थलांतरप्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आगाराचे बांधकाम पाडण्यास देखील गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. इमारत परिसरातील २५ टक्के जागा ही आगार प्रशासनास वापरण्यासाठी देण्यात आली आहे. - जे. के. पाटील, आगार प्रमुख, कऱ्हाड