शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

बोरखळ येथे दोन गटांत वाट देण्यावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : तालुक्यातील बोरखळ येथे वाटेत ठेवण्यात आलेली ट्रॅक्टरची अवजारे काढण्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी ...

सातारा : तालुक्यातील बोरखळ येथे वाटेत ठेवण्यात आलेली ट्रॅक्टरची अवजारे काढण्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबत विनोद अर्जुन रसाळ (वय ३५, रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १९ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घराजवळील रस्त्यावर ट्रॅक्टरची अवजारे ठेवली होती. मात्र, जयश्री सुभाष रसाळ (५८), हणमंत सुभाष रसाळ (२३, दोघे रा. बोरखळ) यांनी विनोद यांना ''तुम्ही येण्या-जाण्याच्या वाटेत ठेवलेली ट्रॅक्टरची अवजारे उचला, आम्हाला कडबा आणायचा आहे,'' असे सांगितले. मात्र, विनोद यांनी ''मी ट्रॅक्टरची अवजारे उचलणार नाही, मला ठेवायला जागा नाही,'' असे सांगितले. याचा राग आल्यामुळे जयश्री रसाळ यांनी विनोद यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावेळी हणमंत रसाळ याने विनोद यांच्या डोक्यात आणि उजव्या हातावर दगड फेकून मारला. यात विनोद जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी शनिवार, दि. २० रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जयश्री आणि हणमंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जयश्री सुभाष रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरखळ येथे बसस्थानकाशेजारी असलेल्या परसात वाटेत लावलेली ट्रॅक्टरची पलटी व रोटर काढून बाजूला लावा, असे कुसुम अर्जुन रसाळ यांना जयश्री यांनी सांगितले. या कारणावरून नीलेश अर्जुन रसाळ, विनोद अर्जुन रसाळ, मेघा विनोद रसाळ, दीपाली अर्जुन रसाळ, गणेश नीलेश रसाळ (सर्व रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी एकत्र येत जयश्री यांचा मुलगा हणमंत रसाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. या भांडणात फिर्यादी जयश्री यांची कपडे फाटली आणि गळ्यातील मंगळसूत्र आणि फोन पडून गहाळ झाला.

याप्रकरणी शनिवार, दि. २० रोजी तक्रार दिल्यानंतर कुसुम रसाळ, नीलेश रसाळ, विनोद रसाळ, मेघा रसाळ, दीपाली रसाळ, गणेश रसाळ या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.