शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत सातबारा देत नाही तोपर्यंत लढा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

म्हसवड : सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकऱ्यांची मालक नावे व आणेवारी नोंद केलेला ...

म्हसवड : सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकऱ्यांची मालक नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत पाटणकर निवेदनाद्वारे दिला आहे.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले म्हसवड परिसर कूळ हक्क शेतकरी आंदोलन दि. ११ फेब्रुवारीपासून सुरू आहे. आंदोलनाबाबत वेळोवेळी निवेदनेही दिली; परंतु सरकारकडून ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे राज्यात ४४ ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलकांना दहिवडी येथील आंदोलनात सहभागी करून मोठा लढा दिला जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.

येथील सरंजामाची हजारो शेतकऱ्यांच्या सातबारावर जी बेकायदेशीररीत्या सरकारने नावे ठेवलेली आहेत, ती कायमस्वरूपी काढून टाकावीत व हजारोंच्या संख्येने असलेल्या कुळांचीच मालकी हक्काची १६ आणे आणेवारी नोंद केलेला संगणकीय सातबारा म्हसवड परिसरातील आंदोलक शेतकरी बांधवाच्या हाती द्यावा.

सन २०१६ डिसेंबरपासून सर्व शासकीय कामाकरिता संगणकीय सातबारा वापराचे आदेश सरकारने जारी करून पारंपरिक पुस्तकी सातबारा वापरावर बंदी लागल्यामुळे येथील संबंधित शेतकरीबांधव अडचणीत आले आहेत. वर्षानुवर्षे जमीन कसत असलेल्या शेतकरी कुटुंबांचे जमिनीच्या सातबारा सदरी निरंतर, संरक्षित व इतर हक्कातील कुळांच्या रेषेवर बेकायदेशीररीत्या सरंजामशाहांची सरकारने अस्तित्वात ठेवलेली पोकळ व बोगस नावे नोंद ठेवून तब्बल आण्याचा सरकारनेच केलेला सातबारा कुळांच्या मालकी हक्काचा नावे १६ आणे करून जोपर्यंत सरकार हाती देत नाहीत, तोपर्यंत शेतकरी बांधवांचे कुटुंबांसमवेत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे.

(चौकट)

चुका सरकारनेच दुरुस्ती कराव्यात...

‘कसेल त्याची जमीन, कूळ कायदा, कमाल जमीन धारणा आदी सरकारने कायदे वेळोवेळी केले. राज्यात त्याची ज्याच्या त्यावेळी अंमलबजावणीही झाली. म्हसवड भागात मात्र सरकारने दुर्लक्षच केले. म्हसवड भागातील हजारो गोरगरीब शेतकरी कुटुंबे दीडशे वर्षांपूर्वीपासून स्वत: कसत असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर सरंजामाची पोकळ ठेवलेली नावे ही चूक सरकारचीच आहे. त्यापुढे वरचेवर केलेल्या चुका सरकारनेच दुरुस्त करणे गरजेचे आहे.

20दहिवडी

फोटो : दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनात म्हसवड परिसरातील शेतकरी सहभागी झाले आहेत.