शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

बंद गाड्यांमुळं पाचगणीत एकेरी मार्ग!

By admin | Updated: November 23, 2015 00:27 IST

गॅरेजचालकाची कमाल : पर्यटकांची होतेय फसगत; अरुंद रस्त्यामुळे वाहतुकींचा तासन्तास खोळंबा

पाचगणी : टेबल लॅण्डमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या पाचगणीत दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. जगभरात पाचगणीचे नाव चांगल्या अर्थाने जाण्याऐवजी वाईट कारणानेच पोहोचत आहे. या ठिकाणी असलेल्या एका गॅरेजमध्ये दुरुस्तींसाठी आलेल्या कार एकामागे एक अनेक वर्षांपासून लावलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता एकेरी बनला असल्याचे तासन्तास वाहतुकीची कोंडी होत आहे. पाचगणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होत असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील बंद स्थितीतील उभ्या असलेल्या वाहनांचा अडथळा होत आहे. हा अडथळा पोलीस यंत्रणा केव्हा दूर करणार व वाहतुकीला केव्हा शिस्त लागणार, अशी चर्चा पाचगणी शहरात रंगली आहे.याबाबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने याबाबत पाचगणी पोलिसांना या गाड्या काढण्याबाबत निवेदन दिले आहे. अद्यापही कसलीच कार्यवाही न झाल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आंदोलनाच्या तयारीत असल्याचे या पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अशा प्रकारची नादुरुस्त वाहने, बंद स्थितीतील गाड्या मोठ्या प्रमाणावर पार्क करून ठेवल्या आहेत. काही गाड्यांचा मालकांचाही पत्ता नाही. त्यामुळे अशा गाड्यांमुळे पर्यटकांच्या गाड्यांना वाहतूक करताना मोठे अडथळे निर्माण होतात तर पाचगणीकरांचे असे ओंगळवाणे दर्शन पर्यटकांच्या दृष्टीस पडते. त्यामुळे या गाड्यांना तातडीने रस्त्यावरून हटवून शहरातील रस्ते शिस्तप्रिय बनवावेत, अशी मागणी नागरिकामंधून होत आहे. अविनाश भोसले म्हणाले, ‘बाजारपेठेतील रस्ते हे अगोदरच लहान असल्याने त्या बाजूला उभ्या असणाऱ्या वाहनामुळे हे रस्ते आणखीनच लहान बनत आहे. व वाहनांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांमध्ये वादावादी होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या वाहनचालकांना सक्त ताकीद देऊन ही वाहने इतरत्र हलवण्यास सांगण्याची गरज आहे, अशा प्रकारचे निवेदन आम्ही पोलीस ठाण्याला दिले आहे. यावर पोलीस ठोण काय कारवाई करतेय, याकडे आमचे लक्ष आहे. ही वाहने तातडीने हटवली नाहीत तर मात्र आम्ही पक्षपातळीवर स्वाभिमानी रस्त्यावरही उतरून आम्ही आंदोलन छेडू. ही वाहने काढून पाचगणी शहरतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेऊन पर्यटकांना व वाहनचांलकाना गाड्या चालवताना कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.’ पाचगणीमध्ये रस्त्याच्या कडेला नादुरुस्त गाड्या रस्त्यावर उभ्या असल्याने धोकादायक ठरत आहेत. (वार्ताहर) एकदा लावलेली गाडी कित्येक दिवस काढली जात नाही. अनेकदा महिनोंमहिने त्यावरची धूळ निघालेली नाही. यामुळे पाचगणीकरांना विशेष काही वाटत नसले तरी जगाच्या नकाशावर पाचगणीचे नाव बदनाम होत आहे. हे टाळणे गरजेचे आहे.- नागेश कारंडे पाचगणीशहरात चार ठिकाणी विस्कळीतपणापाचगणी शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारत आहे. मात्र, शहराची भौगोलिक विस्तार कमी असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील शिवाजी चौक, टेबल लॅण्ड परिसर, बाजारपेठ, बसस्थानक या परिसरात दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत अस्ताव्यस्त गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे बाहेरुन आलेल्या पर्यटकांना वाहने लावण्यास जागा राहत नाही. तसेच वादाचेही प्रकार अनेकदा घडत आहेत.