शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भावना जितकी निर्मळ तेवढा माणूस मोठा

By admin | Updated: September 14, 2014 23:51 IST

काडसिध्देश्वर महाराज : अरुण गोडबोले यांच्या ‘सत्तरीचा सातारकर’ ग्रंथाचे प्रकाशन

सातारा : ‘कोणताही माणूस हा जन्मताना सर्वसामान्य म्हणूनच जन्माला येतो; पण त्याच्या बुद्धिसामर्थ्यावर तो सामान्य किंवा असामान्य म्हणून घडला जातो. सर्वांचेच पंचभूतातीत शरीर हे एक सारखेच असते; पण आकलन, आचरणावर आपण उत्तम, मध्यम किंवा बुद्धिवान होणार हे ठरत असते. माणूस वयानं, वजनानं मोठा होऊ शकत नाही तर माणसाची भावना जितकी निर्मळ तेवढा तो माणूस मोठा होतो, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. संपत्ती ही संस्कृती नाही तर संस्कृती ही संपत्ती झाली पाहिजे,’ असे उद्गार सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी काढले.अरुण गोडबोले यांच्या सप्तदशपूर्ती निमित्त शाहू कला मंदिर येथे आयोजित स्रेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवाजीराजे भोसले, मारुतीबुवा रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सप्तदशपूर्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते अरुण गोडबोले व अनुपमा गोडबोले यांचा पगडी, सन्मानपत्र, शाल, गणेशमूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गोडबोले यांना पहिला ‘रसिक अग्रणी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी ‘सत्तरीचा सातारकर’या ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी योगेश जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘सत्तरीचा सातारकर’ या ग्रंथाचे संपादक मधू नेने यांनी ग्रंथाविषयी माहिती दिली. प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अच्युत गोडाबोले यांनी आभारमानले. (प्रतिनिधी)