शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून साकारले शेततळे व स्मशानभूमी

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

कासाणी ग्रामस्थांची एकी : शासकीय अनुदानाशिवाय केले काम पूर्ण

बामणोली : ‘गाव करील ते राव करील काय?’ या ग्रामीण म्हमीप्रमाणे कासाणी, ता. सातारा या कास पठारालगतच्या दुर्गम गावकऱ्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखविली.ग्रामस्थांनी कोणत्याही अनुदानाशिवाय शेततळे आणि स्मशानभूमी रस्ता श्रमदानातून बांधला. २०१३ मध्ये पावसाळ्यात याच गावातील शेकडो जनावरे अतिवृष्टीने दगावली होती. तसेच एका शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यूही झाला होता. घाटाईदेवी मंदिरालगत असणाऱ्या या गावात मुरघ रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटरचा उताराचा कच्चा रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला की, हा रस्ता पाऊस व चिखलामुळे बंद होतो. त्यामुळे गावकऱ्यांनी गावापासून दोन किलोमीटर डोंगरातून डांबरी रस्त्यापर्यंत पायपीट चालू होते. सध्या या रस्त्याचे खडीकरणाचे व डांबरीकरणाचे काम चालू आहे. गावाबाहेर ‘वेताळचा माळ’ परिसरात एक पाणवठा आहे. या पाणवठ्यातील पाणी वाहते असल्यामुळे ते न अडविल्यामुळे वाया जाते. या पाण्याचा सदुपयोग करता येईल का? या उद्देशाने ग्रामस्थांनी एकसंधतेने निर्णय घेऊन ग्रामविकास मंडळाकडे गावच्या काही शिल्लक रक्कमेतून व कास पठारावरील वनकमिटीकडे जमा शुल्कातील काही रक्कम काढून श्रमदान व मजुरी करून या पाणवठ्याच्या जागी शेततळे बांधले. गावातून या शेततळ्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे ७०० मीटर लांबीचा रस्ताही तयार केला.या शेततळ्यात आज सुमारे ३ लाख लिटरहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असताना कासाणी गावकऱ्यांनी श्रमदानातून कोणतेही शासकीय अनुदान न घेता हे बांधले आहे. बांधलेल्या शेततळ्याची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे करून ग्रामस्थांचे कौतुक केले व इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार काढले. ग्रामस्थांनी एकी ठेवली तर डोंगराएवढे काम ते सहज करू शकतात, याची प्रचिती यामुळे आली. (वार्ताहर)आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थ महिला, युवकांनी एकमुखाने निर्णय घेऊन गावालगतच असणाऱ्या पाणवठ्यावर शेततळे बांधण्याचे ठरविले. सर्व ग्रामस्थ महिला यांनी सुमारे १५-२० दिवस श्रमदान करून या शेततळ्याचे काम पूर्ण केले. यासाठी ग्रामविकास मंडळ, कासाणी व संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी, कासाणी यांच्याकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली. यासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा निधी घेतलेला नाही. - लक्ष्मण बादापुरेअध्यक्ष, वनव्यवस्थापन कमीटी, कासाणीसर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता व शेततळ्याचे काम आम्ही एकसंधतेने पूर्ण केले. शेततळ्यातील पाण्यामुळे आम्हाला शेती तसेच गुरेढोरे जंगली पशु-पक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. तसेच स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची ही सोय झाली आहे. आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदान केल्यामुळेच हे सहजशक्य झाले आहे. विजय बादापुरे,ग्रामस्थ, कासाणी, ता. सातारा.