शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नजर हटते..दुर्घटना घडते !

By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST

महामार्गाची दुरवस्था : साईडपट्ट्या खचल्याने वाहने कलंडण्याचे प्रमाण वाढले

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने होत असले तरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौकापर्यंत महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना थोडी नजर हटली तरी अपघात झालाच म्हणून समजा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवराज पेट्रोल पंपापासून अजंठा चौकापर्यंत तीव्र उतार आहे. या उतारावरील साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अचानक अनेक वाहने कलंडत आहेत.
महामार्गाच्या कडेला रिफ्लॅक्टर नाहीत. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत या चौकात वाहन कलंडून सात अपघात झाले आहेत. त्यामध्ये गंभीर अपघात म्हणजे कंटेनर कारवर कोसळला होता.
दुसरी घटना त्याच ठिकाणी एक ट्रक साईडपट्टीवरून नाल्यात उलटला होता. अशा प्रकारे वारंवार अपघात होत आहेत. मात्र, प्रशासनाचे अद्याप याकडे लक्ष नाही. महामार्गावरून सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात.
त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड ही ठिकाणे अत्यंत धोकादायक बनली आहेत. (प्रतिनिधी)

वाळू रस्त्यावर
रात्रीच्या सुमारास अवैध वाळूउपसा करणाऱ्या ट्रॉली महामार्गावरून जात असल्याने रस्त्यावर छोटे-छोटे वाळूचे कण पडलेले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौक या दरम्यान नेहमी रहदारी असते. या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा टापू खरंतर सुरक्षित पाहिजे; परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून पुन्हा रस्ते जैथे होत असतात. साईडपट्टी आणि सेवा रस्त्याच्या उंचीमध्ये बराच फरक असल्यामुळे अपघात होत असतात, असे रस्ता बनविणाऱ्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.