शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

भोंगा सुरू झाल्याने सगळ्यांचीच पळापळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

सातारा : चोरीच्या घटना घडू नये, प्रयत्न झाला तरी त्याची माहिती परिसरातील नागरिक, मालकाला व्हावी, यासाठी बँक, सराफपेढीत विविध ...

सातारा : चोरीच्या घटना घडू नये, प्रयत्न झाला तरी त्याची माहिती परिसरातील नागरिक, मालकाला व्हावी, यासाठी बँक, सराफपेढीत विविध उपकरणे बसविलेली असतात. सदर बझारमधील एका सराफपेढीत मात्र मालकानेच दुकाने उघडले अन् सायरन सुरू झाला. काही केल्या तो थांबत नव्हता. काही तरी गोंधळ असेल असे समजून नागरिकांची गर्दी वाढली. अखेर वायर तोडून तो बंद करण्यात आला.

बँका, मोठे व्यापारी तसेच घरीही चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत पोलिसांतर्फे नेहमीच आवाहन केले जाते. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर बसविले जातात. ही यंत्रणा असलेले दुकानाचे शटर कोणी उघडण्याचा प्रयत्न केला तर भोंगा वाजण्यास सुरुवात होते. काही वेळा संबंधित दुकानाचे मालक, व्यवस्थापक, पोलिसांना मेसेज जातात. मोठा अनर्थ टळत असल्याने साताऱ्यातील अनेक व्यापाऱ्यांनी अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत.

सदर बझारमध्येही गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. एका सराफपेढीचे मालकही आले. त्यांनी शटर उघडले असता भोंगा वाजण्यास सुरुवात झाली. वास्तविक हा भोंगा नेहमीच वाजत असतो. मात्र भोंगा रिमोटच्या साहाय्याने तो बंद करतात. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. नेहमीप्रमाणे संबंधित दुकानदाराने रिमोटद्वारे भोंगा बंद करण्याचा प्रयत्न केला; पण तो बंद काही केल्या होईना. हा आवाज सर्व परिसरात झाला. सुमारे अर्धा तास तो वाजत असल्याने काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी वाढू लागली. अखेर त्यांतीलच एका व्यक्तीने वायर तोडून सायरन बंद केल्यानंतर जीव भांड्यात पडला.