शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या बाटलीएवढा तरी दुधाला भाव द्या

By admin | Updated: March 20, 2016 00:26 IST

सोमंथळीत दूध परिषद : सत्ता बदलली पण सिस्टिम नाही बदलली; जानकर यांचा भाजपवर घणाघात

फलटण : ‘आमच्यामुळे राज्यात परिवर्तन होऊन सत्तेत बसलात. आमच्यामुळे सत्ता येऊ शकते तर आम्ही आमची सत्ता आणूही शकतो, एवढे लक्षात ठेवा. आम्ही लढणारे असून, मंत्रिपदासाठी भीक मागणारे नाही. राष्ट्रीय पक्षाना मस्ती आली असून, सत्ता बदलली तरी सिस्टीम बदलली नाही,’ असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी भाजपचे नाव न घेता केला. दरम्यान, दुधाला दारूच्या बाटलीएवढा तरी भाव द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमंथळी, ता. फलटण येथे आयोजित दूध परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, अ‍ॅड. नरसिंह निकम, चेतन शेट्टी, सागर खोत, बंजरग खटके, बजरंग गावडे, अमोल खराडे, विराज खराडे, संतोष ठोंबरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जानकर म्हणाले, ‘सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, विजेचा प्रश्न ऐरणीवर असताना जर विद्युतवितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांची वीजबिलाअभावी कनेक्शन तोडल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. एकाही शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरून नये. राष्ट्रीय समाज पक्षाला गुजरात, ओडीसा, कर्नाटक, गोवा या राज्यांत निवडणूक लढविण्यास मान्यता मिळाली असून, कार्यकर्त्यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. यापुढे जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व रासपचा उमेदवार उभा असेल तिथेच आपण वेळ देणार आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ३५५ तालुक्यांपैकी २७८ तालुक्यांत पाऊस नाही. बाकीच्या तालुक्यांत ५९ टक्के पावसाची नोंद आहे. फलटण तालुक्यातील ही अनेक गावे दृष्काळग्रस्त आहेत. या भागातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसायावर अवंलबून असून, आत्ताच्या परिस्थितीत चारा, पाणी, दुधाला भाववाढ आदी मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहे’ दुधाला मात्र १७ रुपये दर... सध्या शासनाकडे ५० लाख लिटर दूध संकलन आहे तर खासगी दूध कंपन्याकडे ९० लाख लिटर संकलन होत आहे. पॅकिंगमध्ये ६५ लाख लिटर दूध विकले जात आहे; परंतु सध्या गाईच्या दुधाला मराठवाड्यात १५ ते १६ लिटर भाव तर फलटणमध्ये १७ ते १८ तर सांगली, कोल्हापूरला २१ ते २२ रुपये दराने घेतले जाते. परत हेच दूध पॅकिंगमध्ये ४० रुपये लिटरने विकले जाते. पाण्याची बाटलीही २० रुपये लिटरने तर दारूची बाटली ६० रुपयांनी विकली जाते. दुधाला मात्र १७ रुपये दर आहे. दुधाला दारूच्या बाटलीएवढा तरी भाव द्या, असा टोला सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला लगावला.