शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरने चिरडल्याने जीवलग मित्रांचा अंत

By admin | Updated: April 15, 2015 00:19 IST

फलटणवर शोककळा : जेवण करुन ट्रककडे परतताना काळाचा घाला

फलटण : फलटण शहरातील दोन जीवलग मित्रांवर नेवासे रस्त्यावरील वडाळा हद्दीत काळाने घाला घातला. एका ढाब्यावर जेवन करुन स्वत:च्या ट्रककडे जात असताना आलेल्या भरधाव ट्रकने दोघांना चिरडले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकताच फलटणमध्ये शोककळा पसरली. याबाबत माहिती अशी की, युसूफ इस्माईल शेख (वय ४०, रा. हत्तीखाना, कसबा पेठ, फलटण) यांचा मालट्रक आहे. या ट्रकमधून ते अनेकदा मालाची वाहतूक करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र महेश दत्तात्रय वेदपाठक (३०, रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) हेही असत. युसूफ शेख व महेश वेदपाठक हे रविवार, दि. १२ रोजी मालट्रक घेऊन नेवासेकडे निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास वडाळा येथील एका ढाब्यावर जेवून करुन ते त्यांच्या मालट्रककडे जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने दोघांनाही चिरडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त फलटण शहरात येऊन धडकताच शोककळा पसरली. युसूफ शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले तर महेश यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण अस परिवार आहे. (प्रतिनिधी)