शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणामुळेच देश महासत्ता बनेल : शंकरराव गाढवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST

खंडाळा : ‘खंडाळा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात खंडाळा विभाग शिक्षण समितीने भरीव योगदान दिले आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून दुष्काळी भागात ...

खंडाळा : ‘खंडाळा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात खंडाळा विभाग शिक्षण समितीने भरीव योगदान दिले आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून दुष्काळी भागात लावलेल्या या रोपाचा वटवृक्ष झाला आहे. त्यातूनच तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली. शिक्षणाचा हा वसा यापुढेही अविरत चालू राहील. भारताला महासत्ता करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी शिक्षण क्षेत्राची आहे,’ असे मत खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी व्यक्त केले.

बावडा (ता. खंडाळा) येथे मिटकॉन फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारलेल्या राजेंद्र विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिटकॉन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बावडेकर, संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, जि. प. सदस्य मनोज पवार, सचिव अनिरुद्ध गाढवे, माजी सभापती एस. वाय. पवार, प्रसाद पवार, तेजस बावडेकर, संदेश बावडेकर, सरपंच गणेश पवार, महेश राऊत, नारायण पवार, गणपत पवार, अतुल पवार, रमेश पवार, परशुराम फडतरे, वैभव पवार, अंकुश पवार यांसह प्रमुख उपस्थित होते.

मिटकॉन फाऊंडेशनने या शाळेचे संपूर्ण नूतनीकरण करून दिले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे. इमारतीमुळे शाळा स्वयंपूर्ण बनली आहे. या कार्यक्रमाचे प्राचार्य लक्ष्मण सोळसकर यांनी स्वागत केले. सुजित डेरे यांनी सूत्रसंचालन केले.

... .............................

फोटो मेल केला आहे .