शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक मूर्ती

By admin | Updated: August 16, 2015 21:48 IST

कऱ्हाडात कार्यशाळा : एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचा उपक्रम; तेरा शाळांचा सहभाग

कऱ्हाड : येथील एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबच्या वतीने आयोजित इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत शहरासह परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. या कार्यशाळेत शहरासह परिसरातील १३ विद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. येथील लाहोटी कन्या प्रशालेत एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबच्या वतीने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजिरी ढवळे होत्या. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष प्रकाश खोचीकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव प्रसाद पावसकर, ए. आर. पवार, क्लबचे इको फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मितीचे मार्गदर्शक महेश कुंभार यांची उपस्थिती होती.नगराध्यक्षा अ‍ॅड. साळुंखे म्हणाल्या, ‘शहरात पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभारणाऱ्या एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबच्या उपक्रमांमुळे कऱ्हाडची पर्यावरणपूरक शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांसह पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी क्लबच्या उपक्रमांना पालिकेने नेहमीच पाठबळ दिले आहे.’प्रकाश खोचीकर यांनी क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गणपतराव कणसे, शरद शिंंदे, रामभाऊ जोशी, आनंदा थोरात, रमेश ओझा, शिवाजीराव जाधव यांनी स्वागत केले. क्लबचे सचिव प्रसाद पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश पवार यांनी आभार मानले. कार्यशाळेत शाळानिहाय विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी स्नेहल राजहंस व लीना गोसावी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)