शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात जिल्ह्यात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या काळात वयोवृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण एकीकडे अधिक असताना दुसरीकडे मात्र ० ते १४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या काळात वयोवृद्धांचे मृत्यू होण्याचे प्रमाण एकीकडे अधिक असताना दुसरीकडे मात्र ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात अत्यंत नगण्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांच्या टी सेल (पेशी) सक्रिय झालेल्या नसतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या मुलांचा कोरोनापासून बचाव झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लहान मुले गांगरुन गेली होती. वयोवृद्धांचे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना लहान मुलांच्या काळजीने पालक अस्वस्थ झाले होते. मात्र, जिल्ह्यात केवळ एका सहा वर्षाच्या बालिकेचा इतर आजार आणि कोरोनामुळे मृत्यू झाला. अन्यथा एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही. भीतीपोटी लहान मुलांना घरातून बाहेर साडले जात नव्हते. शिवाय मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याचेही मुलांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे मुलांपासून कोरोना कोसो दूर राहिला.

जिल्ह्यात ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे मृत्यू

९ १

२०१९- २०२०

चौकट : मुलांच्या मृत्यूचे कारण

कोरोना काळात केवळ एका बालिकेचा मृत्यू झाला. संबंधित बालिकेच्या डोक्यात ताप मुरला होता. त्यातच कोरोनाची लागण झाली. या दोन्ही आजारांमुळे मुलीचा मृत्यू झाला. तसेच गेल्यावर्षी ९ मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये काही मुले काविळ, डीहायड्रेशन, अपघात अशा कारणांनी मृत्यूमुखी पडली होती.

चौकट : मास्कचा झाला चांगला उपयोग

कोरोनाच्या भीतीमुळे लहान मुलांना घराबाहेर सोडले जात नव्हते. घरात असतानाही मुलांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे इन्फेक्शन झाले नाही. परिणामी मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे.

चौकट : काय म्हणतात चिल्ड्रन स्पेशालिस्ट

लहान मुलांमध्ये थायमस नावाची गळ्याजवळ एक ग्लॅड असते. ती पूर्णपणे अ‍ॅक्टिवेट झालेली नसते. त्यामुळे लहान मुलांचे कोरोनापासून बरेचसे संरक्षण झाले. लहान मुलांच्यात काही टी सेल असतात. त्यासुद्धा सक्रिय झालेल्या नसतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या मुलांना संरक्षण मिळाले.

डॉ. अरूंधती कदम

बालरोग तज्ज्ञ

प्रतिक्रिया :

लहान मुलांना बीसीजी आणि गोवर या लसीही दिलेल्या असतात. त्याही काही प्रमाणात लहान मुलांचे संरक्षण करतात. परिणामी कोविडचे इन्फेक्शन लहान मुलांना न झाल्याचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.

डॉ. ज्ञानेश्वर हिरास

फोटो : २२ मास्क