शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:21 IST

वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन!पावित्र्य लयाला : वाई तालुक्यातील स्थिती; धार्मिक विधीचे साहित्यही पात्रात

वाई : वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वाई तालुक्यातून वाहत जाते. उगमानंतर नदीपात्रावर वाई तालुक्यातच धोम धरण आहे. सध्या वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथे नदीपात्रात प्रवाही पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून भयावह स्थिती झाली आहे़ तर नदीपात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जलपर्णी आहे.

धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कपडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पावित्र्य हरपून गेले आहे़ नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेले आहे. या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्र जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असे दिसत आहे.नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समूह संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आले. तर पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले होते़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़, त्यावेळी धोम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये खर्च केला होता़ यावेळी प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या वतीने नदीपात्र स्वच्छता उपक्रमास जेसीबी, ट्रॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती़.या अभियानात धोम ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय होता़ यावेळी सलग दोन महिने नदी स्वच्छतेचे काम चालू होते. पाण्यातील सर्व वनस्पती व शेवाळ काढण्यात आल्याने जलाशयाने मोकळा श्वास घेतला होता़ यामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून योगदान दिले होते़. या उपक्रमास राष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, मकरंद शेंडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते; परंतु नदीपात्रात प्रवाही पाणी येत नसल्याने पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपयोजना करावी व नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांनी केली आहे़.

टॅग्स :pollutionप्रदूषणSatara areaसातारा परिसर