शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या संख्याबळाने होतेय पळापळ

By admin | Updated: May 11, 2015 23:27 IST

पोलिसांवर ताण : दिवसेंदिवस वाढतोय गुन्हेगारीचा आकडा

औंध : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ३९ गावे येतात व प्रत्येक गावाला एक पोलीस म्हटले ३९ ची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात २९ स्टाफ असल्याने व भागातील वाढता क्राईम रेट लक्षात घेता औंध पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची मात्र पळापळ होताना दिसत आहे. सध्या औंधमध्ये पाच बीट व दूरक्षेत्र पुसेसावळीमध्ये पाच बीट आहेत. तसेच सद्य:स्थितीत सहायक फौजदार २, हेड कॉन्स्टेबल १०, पोलीस नाईक ५, पोलीस शिपाई ६ व महिला पोलीस ६ असा स्टाफ आहे. औंध आणि परिसरातील वाढती वाहतूक व त्यामुळे वाढलेले अपघाताचे प्रमाण खूप आहे. तसेच विद्युत मोटारी भागातील पवनचक्की केबल, कॅनॉलच्या आसपासच्या केबल तसेच डी. पी. चोरींच्या प्रमाणात वाढ झाली असून, अपुऱ्या संख्याबळामुळे सर्वच गुन्ह्यांचा तपास पूर्ण होतोयच असे काही दिसून येत नाही.औंध आणि परिसरातील जमिनीचे वादच जास्त होत असल्याने वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्यावर दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनला येत असतात. सध्या जास्तीत जास्त गुन्हे जमिनीच्या पाईपलाईनच्या वाटपाच्या वादावरूनच दाखल झालेले आहेत. (प्रतिनिधी)पोलिस कुमक कमीचऔंध हे पर्यटन क्षेत्र आहे. तसेच यंदा ऊस वाहतूकही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या भागातून झाली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडल्याचे एक दिवसाआड घटना होत आहे. एकूणच वाढता क्राईम रेट, वाहतूक रहदारी भुरट्या चोऱ्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी आहे. त्या कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ होताना दिसत आहे. त्यामुळे अजून ३ हेडकॉन्स्टेबल, २ पोलीस नाईक व ५ पोलीस शिपाई वाढविण्यात यावे. जेणेकरून एका गावास एक पोलीस मिळावा, ही अपेक्षा लोकांच्यातून व्यक्त होत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात औंध परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. अनेक ठिकाणाहून नवविवाहित जोडपी औंधच्या यमाई देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांनाही याचा धोका आहे.