शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

एका फ्लॅटमुळे संपूर्ण अपार्टमेन्ट बदनाम!

By admin | Updated: October 30, 2015 23:31 IST

‘हाय प्रोफाइल’ देहव्यापार : फोफावणाऱ्या विषवल्लीच्या मुळावर घाव घालण्याचे पोलिसांपुढे आव्हान

सातारा : शहरात तीन महिन्यांत दोन ठिकाणी फ्लॅटमध्ये सुरू असलेला ‘हाय प्रोफाइल’ देहव्यापार उघड झाल्याने अशा अपार्टमेन्टमधील रहिवाशांच्या समस्या, तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. एका फ्लॅटमुळे संपूर्ण अपार्टमेन्टची होणारी बदनामी आणि नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या ‘साइड इफेक्ट्स’वर चर्चा सुरू झाली असून, वेगाने फोफावणाऱ्या या विषवल्लीची पाळेमुळे खणण्यात पोलिसांना यश मिळणार की ‘तांत्रिक’ खतपाणी मिळून त्या वाढतच राहणार, अशी साधार भीती नागरिकांमध्ये आहे. शुक्रवार पेठेतील अपार्टमेन्टमध्ये छापा टाकून बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. अडीच महिन्यांंपूर्वी विसावा नाका परिसरातील अपार्टमेन्टमध्ये अशीच कारवाई झाली होती. शाहूनगर, शाहूपुरी, सदर बझार भागातही कारवाया झाल्या आहेत. असे आणखी काही अड्डे बड्यांचे चोचले पुरवीत असल्याची उघड चर्चा आहे. एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याने अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या महिलांना भेदक नजरांचा तर पुरुषांना अरेरावीचा सामना करावा लागतो. कर्ज काढून फ्लॅट घेणाऱ्या मध्यमवर्गीयांना अत्यंत अपरिचित, त्रासदायक वातावरण अशा अपार्टमेन्ट्सच्या परिसरात तयार होते. इमारतीत ये-जा करणाऱ्या प्रत्येक महिलेकडे ‘त्याच’ नजरेने पाहणारे इमारतीभोवती घोटाळत असतात. रहिवाशांनी त्यांच्याकडे वैतागलेल्या नजरेने पाहिल्यास पार्किंगमधील गाड्यांची नासधूस करण्यापर्यंत संबंधितांची मजल जाते. घराबाहेर पडताना महिलांच्या अंगावर काटा उभा राहतो. काही ठिकाणी वादावादी, मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, स्वयंरोजगार करणारे, खासगी नोकरी करणारे पै-पै जुळवून फ्लॅट घेतात आणि अपार्टमेन्टमध्ये असे प्रकार सुरू झाले की नखशिखान्त हादरतात. अनेक ठिकाणी देहव्यापाराच्या जोडीने गुंडगिरी बोकाळत जाते. काही अपार्टमेन्टमधील रहिवाशांनी फ्लॅट विकून दुसरीकडे घर घेतल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे वेगाने पसरत चाललेले हे तण समूळ नष्ट करावे, या मागणीचा रेटा वाढत आहे. (प्रतिनिधी) पोलिसांना खरेच माहीत नसते? सभ्य नागरिकांच्या वसाहतीत प्रतिष्ठितांची ऊठ-बस असलेली अशी ठिकाणे तयार होतात, गुन्हेगारांची वर्दळ वाढते, शांतता बिघडते आणि या साऱ्याची पोलिसांना माहितीच नसते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. नागरिक कधी इमारत बांधणाऱ्या बिल्डरकडे तर कधी परिसरातील नेत्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतात. पण ‘पोलिसांनीच कडक भूमिका घेतल्याखेरीज आमचे भोग संपणार नाहीत,’ असे नागरिक सांगतात. माहिती द्या; नाव गुप्त राखू अमुक एका भागात असे कृत्य चालते अशी मोघम माहिती पोलिसांना दिली जाते. नेमकी इमारत, नेमका फ्लॅट अशी चपखल माहिती मिळत नाही. नागरिकांनी पुढे येऊन नेमकी माहिती दिली तर पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव शंभर टक्के गोपनीय राखले जाईल. - पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा