शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 15:36 IST

Road Satara- पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी यांना विनंती करूनही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवण्याची स्पर्धा सदर बाझार येथील नागरिकांतर्फे आयोजित केली आहे.

ठळक मुद्दे विकास धुमाळ यांचा इशारा सदर बाझार-जिल्हा रूग्णालय-पोवई नाका रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

सातारा : पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी यांना विनंती करूनही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवण्याची स्पर्धा सदर बाझार येथील नागरिकांतर्फे आयोजित केली आहे.सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांनी या स्पर्धेची घोषणा केली. दरम्यान, या स्पर्धेची प्रशासनाने दखल न घेतल्यास या रस्त्यावरील खड्डयात स्पर्धेत सहभागी नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड ते सदर बाझार दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी खड्डयांचे पँचिंग वर्क तरी करा, अशी मागणी नागरिकांची आहे. हे काम करण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.

या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डयांतून प्रवास करताना वाहने नादुरूस्त होत आहेत. रिक्षाचे नुकसान होत आहे. चालक या रस्त्याची अवस्था पाहून दुसऱ्या मार्गाचा वापर करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुचाकीस्वार, महिला व नागरिकांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या मार्गावर दररोज छोटे अपघात होत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर