शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला डोस, तर स्थानिक नेत्यांनाही ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच ...

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच आमचे कॅबिनेट मंत्रिपद आहे,’ असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराआधीच डोस दिला, तर लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे ऋण फेडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. ती त्यांनी पार पाडावी, असे इतर पक्षातील नेत्यांनाही त्यांनी ठणकावले.

उदयनराजेंनी शुक्रवारी सर्वांना धक्का देत सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या पाहणीचे निमित्त करुन थेट उद‌्घाटनच करून टाकले. त्यानंतर जलमंदिर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीपासून केंद्रीय पातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला.

उदयनराजे म्हणाले, ‘मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात डोक्यातून नाही, तर मनातून विचार केला. माझ्या मनाला पटते, ते मी करतो. कोरोनाची पार्श्वभूमी पाहता, लोकांची संपूर्ण वाताहात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की जो काय निधी निवडणुकीवर खर्च होणार आहे, तो तिथे खर्च होण्यापेक्षा गरजू आणि उपेक्षितांच्या औषधोपचाराठी निधी मिळाला, तर ते सोन्याहून पिवळे होईल. मी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले, त्याला तसा प्रतिसादही मिळाला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो.’

दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली, त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा हट्ट नडला. याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, ग्रामपंचायतीत राजकारण करत बसण्यापेक्षा समाजाचे ऋण कुठेतरी फेडले पाहिजे, हा विचार काही लोकांच्या मनात येत नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केले नाही, तर समाजकारण केले. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यामुळे मला बरं वाटलं. बिनविरोधच्या निर्णयाचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व्हायला पाहिजे होते. लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार केला पाहिजे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर लोक महत्त्वाचे, समाज महत्त्वाचा आहे. जे लोक आपल्याला मतदान करतात, त्यांच्या जिवावर आपण सत्ता काबीज करतो, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाही असल्याने मी कोणाला जबरदस्ती करणार नाही. नेत्यांनी आत्मचिंतन केलं, तर खूप निधी जो वाया जाणार आहे, तो वाचेल. प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करुन देणे हे माझे कर्तव्य समजतो.’

औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे

औरंगाबादचे नामकरण बदलण्याच्या विषयावर सविस्तर विचार केला पाहिजे. यातून कसलाही उद्रेक होऊ नये. कोणाची मानहानी होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे पूर्वज होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा तर ते केवळ महाराज म्हणून त्यांच्याकडे लोकांनी पाहिले नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो, बॉम्बेचे मुंबई झाले, मग लोकशाहीत लोक निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही उदयनराजेंनी केले.