शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

तेराजणांना मिळाला लाल दिवा; अनेकांनी राखले आपले गड कायम

By admin | Updated: September 16, 2014 23:27 IST

सातारा जिल्ह्यात झाले साठ आमदार ‘लोकनियुक्त’

मोहन मस्कर-पाटील - सातारा -१९५२ ते २00९ या काळात महाराष्ट्रात तेरा विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्यापूर्वीचा काही काळ आहे. या ५७ वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात आजअखेर साठजणांना आमदार तर तेराजणांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापैकी काहीजण सात, पाच, चार, तीन, दोनवेळा आमदार म्हणून कार्यरत राहिले आहेत. १९५२, १९५७ मध्ये जिल्ह्यात अकरा आमदार होते. त्यावेळी सातारा पूर्व, सातारा ग्रामीण, फलटण-माण, माण ग्रामीण, जावळी, खटाव, वाई-खंडाळा, पाटण कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर असे मतदारसंघ होते. १९६२ मध्ये एक मतदारसंघ कमी झाल्याने दहा मतदारसंघ झाले. २00४ पर्यंत हेच कायम होते. २00९ च्या निवडणूका मतदारसंघ पुनर्रचनेनुसार झाल्या आणि फक्त आठच मतदारसंघ राहिले.केवळ सातारा नव्हे तर राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपला दबदबा कायम ठेवला.मात्र, यशवंतराव चव्हाणच सर्वात प्रभावी राहिले. १९५२ पासून हयात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई मंत्री होते. त्यापाठोपाठ मालोजीराजे नाईक-निंबाळकर, यशवंतराव मोहिते, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील-उंडाळकर, मदनराव पिसाळ, श्याम अष्टेकर, भाऊसाहेब गुदगे, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक-निंबाळकर आणि आता शशिकांत शिंदे यांना मंत्री होता आले.यशवंतराव मोहिते, चिमणराव कदम, दादासाहेब जगताप, केशवराव पाटील, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे, विष्णू सोनावणे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तीन तर कॉ. व्ही. एन. पाटील, प्रभावती सोनावणे, कृष्णचंद्र भोईटे, पी. डी. पाटील हे दोनवेळा आमदार झाले.