शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील पळालेला संशयित जाळ्यात!

By admin | Updated: August 13, 2015 22:57 IST

अक्षय पवारला अटक : तालुका पोलिसांची ‘फिल्डिंग’ यशस्वी

सातारा : सुमारे पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात तालुका पोलिसांना गुरुवारी सकाळी यश आले. २५ दिवसांपूर्वी तो स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडला होता; मात्र वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यानंतर पोलिसांना हिसडा देऊन पलायन केले होते. गुरुवारी सकाळी रहिमतपूरमधून त्याला ताब्यात घेण्यात आले.आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) यांचे जमिनीच्या व्यवहारातील रकमेवरून दि. २६ मार्च रोजी अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील प्रमुख संशयित अक्षय लालासाहेब पवार (वय २०, रा. खंडोबाचा माळ, पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गायकवाड यांना अंभेरी घाटात नेऊन मारहाण करण्यात आली होती आणि त्या रात्री सातारा येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. सकाळी ते मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांचा मृतदेह संशयितांनी अंभेरी घाटात नेऊन जाळल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (वय २२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) या तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संदीप रावसाहेब भोसले (वय २८, रा. अग्रम धुळगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) याला अटक झाली. त्यांच्या चौकशीतून अक्षय पवार या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तीन महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर शनिवारी (दि. १८ जुलै) गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षयला डोळेगाव (ता. कोरेगाव) येथील एका पोल्ट्री फार्ममधून ताब्यात घेतले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता, त्याने तेथून पलायन केले होते. रात्रभर पोलीस अक्षयचा पाठलाग करीत होते. मात्र, शहराबाहेर पळण्यात तो यशस्वी झाला होता. (प्रतिनिधी)(संबंधित बातमी पान ५)