शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संशयित घरफोड्यास पाठलाग करून पकडले;

By admin | Updated: May 11, 2015 00:44 IST

दोघे पसार

सातारा : शहरातील पीरवाडी भागात शनिवारी रात्री घरफोडी करून तीन चोरट्यांनी एक लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, सतर्क नागरिक आणि गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी एकास पकडले, तर दोघे पळून गेले. ज्ञानेश्वर ऊर्फ चिव्या नाना भोसले (वय २९, रा. निंबूत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीरवाडी येथील फारूख इसाक शेख यांचे बंंद घर शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास तिघांनी फोडले. शेख हे मेकॅनिक असून, त्यांचे जुना मोटार स्टँड परिसरात दुकान आहे. घरात कोणी नसल्याने शनिवारी रात्री त्यांच्या घराला कुलूप होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सहा तोळ्यांचे ९० हजार रुपये किमतीचे गंठण, अडीच तोळ््याचे ३७ हजारांचे नेकलेस, ४५ हजार रोख आणि टॉप्स असा एक लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने दुचाकीवरून काही जणांनी त्यांचा पाठलाग केला. महामार्ग ओलांडून चोरटे पलीकडील बाजूला गेले, तेव्हा तेथून पोलिसांची गस्तीची गाडी निघाली होती. नागरिक आणि पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला; परंतु तिघांपैकी दोघे पळून गेले, तर ज्ञानेश्वर ऊर्फ चिव्या भोसले पोलिसांच्या हाती लागला. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)