शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

माणच्या ‘देशमुखी’चे रण धगधगतेच!

By admin | Updated: November 28, 2015 00:21 IST

निमित्त बंधाऱ्यांचे : सरकार बदलले तरी आमदारांचा राग कायम; भ्रष्टाचार खरंच बाहेर येणार ?

सातारा : मागील विधानसभा निवडणुकीआधी आमदार जयकुमार गोरे यांना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादीची मोठी फौज गोरेंना घरी धाडण्यासाठी सज्ज होती. माण-खटावची ‘देशमुखी’ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक खेळ्या केल्या होत्या. तेच रण अजूनही धगधगत आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सरकार बदलले असले तरी तो राग मनात कायम ठेवलाय. ‘माण आणि खटाव तालुक्यांत शासनाच्या स्थानिकस्तर विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ७० पैकी ३८ हून अधिक बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता काहीच उपयोग नसणाऱ्या साईटस् निवडल्याने कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. संबंधित विभागाच्या सचिवांनी श्रेयवादाच्या अट्टाहासातून माण-खटावमधील जलयुक्त शिवारची सूत्रे हाती घेतली आहेत. अधिकारी उघडपणे सचिवालय ते मंत्रालयापर्यंत कमिशनराज सुरू आहे. आमचे काही होत नाही, असे सांगत आहेत,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाचे सचिव कोण, हे साऱ्या जगाला माहीत आहे. हा मुद्दा उपस्थित करून आमदारांनी जलयुक्त शिवारमधून झालेल्या कामांचा पंचनामा सुरू केला आहे, हे आता स्पष्ट होत आहे. आमदारांच्या या आरोपांमुळे कामांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. बंधाऱ्यांत पाणी शिल्लकच राहत नसेल तर हा पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. जर गळत्या आहेत तर ज्या ठेकेदारांनी ही कामे केली आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे ठरणार आहे. या ठेकेदारांकडून या गळत्या काढून घ्याव्या लागतील.प्रशासनानेही संबंधित ठेकेदारांच्या बाबतीत काय कारवाई केली आहे?, हे पुढे येणे गरजेचे आहे. ही कारवाई झाली नसेल तर यात फार मोठा भ्रष्टाचार झालाय, हे म्हणायला वाव आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे, गरजेची असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत आमदार गोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना विधानसभेचे तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. गोरेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठ्या हालचाली केल्या होत्या. भ्रष्टाचाराच्या या मुद्द्यावरून आमदार गोरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे. दोन्ही काँगे्रसमधील असणारा संघर्षाचा मुद्दा पुढे आला आहे. (प्रतिनिधी)दोघे असतील भविष्यातील प्रतिस्पर्धी ?मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माण-खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरे यांना कोण शह देणार? याची गणिते मांडली जात होती; तेव्हा प्रशासनात उच्चपदस्थ असणारे अधिकारी लोधवडेचे प्रभाकर देशमुख यांचे नाव अग्रक्रमावर होते. जयकुमार विरुध्द देशमुख असा सामना रंगवण्याच्या हालचाली झाल्या होत्या. देशमुखांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव गोरेंसाठी डोकदुखी ठरु शकते, त्यामुळे भविष्यात गोरेंना देशमुख हेच प्रतिस्पर्धी असतील, असे भाकित राजकीय अभ्यासक व्यक्त करतात.