शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय चुकीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक ...

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आहे. मात्र, कोरोनाच्या काळात घेतलेल्या मासिक सभेला नसल्याचे कारण देत उपस्थित विद्यमान संचालकांनी माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, त्यांच्या मनमानी कारभाराचा हा उत्तम नमुना आहे. याविरोधात योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचे मत पतपेढीचे संचालक राहुल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल वर्षभरापूर्वीच संपलेला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान, संस्थेच्या एकूण १५ संचालकांपैकी सध्या पाच संचालक पदे रिक्त आहेत. यापैकी एका संचालकांचा मृत्यू झाला आहे तर दोन संचालकांनी सेवानिवृत्तीमुळे राजीनामे दिले आहेत. इतर दोन संचालकांनी स्वच्छेने राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सध्या संस्थेचा कारभार दहा संचालकांवर व अध्यक्षांविना सुरू आहे.

वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या मासिक व वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तशाच पद्धतीने आमच्या संस्थेची सभा आयोजित करावी, असे मी वारंवार तोंडी व भ्रमणध्वनीवरून संस्थेचे उपाध्यक्ष यांना सांगितले होते. मी कऱ्हाड कोषागार कार्यालयात कार्यरत आहे. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. अशावेळी मला कऱ्हाड ते सातारा प्रवास करून मासिक सभेला हजर राहणे शक्य नव्हते. याचा विचार न करता संबंधितांनी यातील दोन सभा सायंकाळी सहानंतर प्रत्यक्ष आयोजित केल्या होत्या. कोरोनाच्या काळात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन गर्दी करायची नाही तसेच वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे मी मासिक सभांना हजर राहिलो नाही. सलग तीन मासिक सभांना हजर नसल्याचे कारण देत त्यांनी मला तिसऱ्या सभेनंतर कोरम पूर्ण नसताना संचालकपद रद्द केल्याचे पत्र पाठवले आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे. संस्थेला गेले पाच महिने अध्यक्ष नसताना त्यांच्या शिक्क्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. चेअरमन यांच्या सहीने मला पत्र पाठवले आहे. वास्तविक माझे संचालकपद रद्द करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का? असेल तर त्यांनी प्रथमत: मला तुमचे संचालकपद रद्द का? करू नये? अशी नोटीस देणे आवश्यक होते. म्हणजे मला माझी बाजू मांडता आली असती. नाहीतर तसा ठराव जिल्हा निबंधक, सातारा यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. त्यावर निबंधकांनी योग्य तो निर्णय घेतला असता. मात्र, असे न करता त्यांनी मला थेट तुमचे संचालकपद रद्द केले आहे, असे पत्र पाठवले आहे. माझे संचालकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याबाबत योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.