शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला कवटाळतानाही वाचविले इतरांचे प्राण

By admin | Updated: January 12, 2015 21:48 IST

साखरवाडी : प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या चालकाने अखेरच्या क्षणीही दाखविली कर्तव्यदक्षता

साखरवाडी : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या साखर कारखान्याचे चालक भारत शिंदे यांना गाडी चालविताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या धक्क्यातून सावरणे शक्य नसतानाही शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य बजावत कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील व अन्य तीन व्यक्तींना कोणतीही इजा होऊ न देता गाडी थांबवून शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला.मंगळवार, दि. ६ जानेवारी... दुपारची वेळ... साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील साखर व्यापारी विजय करवा व अन्य दोघांना घेऊन कारखान्याच्या कामानिमित्त त्यांच्या कारमधून अकलूजकडे निघाले होते. ड्रायव्हर म्हणून कारखान्याचे ट्रान्सपोर्ट विभागातील चालक भारत हणंमत शिंदे (वय ५१, रा. साखरवाडी, मूळगाव तांबवे, ता. फलटण) होते. गाडी साखरवाडी -फलटणमार्गे अकलूजकडे भरधाव वेगाने चालली होती. कार पिंपरद, ता. फलटण गावाजवळ आली असता चालक भारत शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी पिंपरद गावाजवळील मंगल कार्यालयाचे पुढे लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. या तीव्र झटक्यातून सावरणे शक्य नसल्याचे शिंदे यांना जाणवले. त्यांनी त्या गंभीरप्रसंगातूनही गाडी नियंत्रणात आणून रस्त्याकडेला उभी केली आणि ती बंद करण्याआधीच अखेरचा श्वास घेतला. प्रल्हाद पाटील व इतर तिघांना काय झाले हे लगेच समजलेच नाही.
भारत शिंदे हे १९९९ पासून न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर काखान्यातील ट्रान्सपोर्ट विभागात चालक म्हणून कार्यरत होते.
त्यांना साखर कामगारांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्य गेटवर शोकसभा घेण्यात आली. यावेळी युनियनचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बाळासाहेब भोसले, मारुती माडकर, चंद्रशेखर किरपेकर, सीताराम माने उपस्थित होते. (वार्ताहर)

शर्थीचे प्रयत्न अयशस्वी
अचानक घडलेल्या गंभीर प्रसंगाने प्रल्हाद पाटलांसह सर्वचजण घाबरले होते. यातून गाडी बंद करणेही लवकर जमले नाही. त्यातूनही सावरत प्रल्हाद पाटील यांनी प्रसंगावधान राखून भारत शिंदे यांना तातडीने फलटण येथे उपचारासाठी आणले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.