अपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:28 IST2019-05-21T18:27:18+5:302019-05-21T18:28:14+5:30
शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

अपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यू
सातारा : शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.
मच्छिंद्र आबासाहेब चितळे (वय २४, रा. धनगरवाडी, माणिकदौंडी, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. अपघातानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले होते. परंतु मच्छिंद्र चितळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
साताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू
सातारा येथील मंगळवार पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृद्धाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
आनंद धोंडीराम वासुदेव (वय ६४, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे पडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वासूदेव यांचा घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अचानक तोल गेला. त्यामुळे ते सुमारे वीस फुटावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.